कोतुळ येथील जयवंतराव रामचंद्र साळवें यांचे निधन.

कोतुळ प्रतिनिधी
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व बहुजन समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे संस्थापक जयवंतराव रामचंद्र साळवें यांचे शुक्रवारी सकाळी निधन.झाले मृत्यू समयी ते 70 वर्षाचे होते काही दिवसांपूर्वी नाशिक येथे त्यांच्या हृदयावर बायपास सर्जरी करण्यात आली होती यानंतर त्यांच्यावर संगमनेर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराने प्रेरित होऊन अहिल्यानगर जिल्ह्यात 1980 च्या दरम्यान त्यांनी कॉलेज जीवनानंतर शैक्षणिक कार्यात स्वतांला झोकून दिले
बहुजन समाज प्रबोधन शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी कोतुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय सुरू केल खासदार, आमदार, शिक्षण महर्षींनां शक्य झाले नाही असे अश्यक असणारे, अकोल्यासारखे आदिवासी भागात त्यावेळी अध्यापक विद्यालय सुरू करण्याचे काम त्यांनी केले. आज काळाच्या ओघात अध्यापक विद्यालयांचा विषय मागे पडला असला तरी त्यांनी सुरू केलेल्या अध्यापक( डी एड) कॉलेजमधून शेकडो विद्यार्थी बाहेर पडले गोर गरिब,दलित, आदिवासी समाजातील हजारो शिक्षक त्यांनी घडविले
दिवंगत जयवंतराव रामचंद्र साळवें यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवार दि 27 जुलै 2025 रोजी जानव्ही लॉन्स कोतुळ तां अकोले येथे सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात कोतुळ येथे सर्वप्रथम त्यांनी डीएड कॉलेज सुरू करून अकोल्यात शिक्षणाची गंगा आणली अध्यापक विद्यालयानंतर,उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, नर्सिंग कॉलेज, यासारखे शिक्षणाची सुविधा त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने सुरु केल्या
केद्रीय समाज कल्याण मंत्री खासदार रामदास आठवले प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई, दिवंगत नेते भाई संगारे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,यांच्यासोबत त्यांची घनिष्ठ मैत्री राहिली अशा राजकीय नेत्यांचा सहवास लाभल्या ने त्यांनी शैक्षणिक कामाबरोबर आंबेडकरी चळवळीतुन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचा नावलौकिक राहिला
स्वाभिमानी,कणखर व तेवढेच दयाळू दानशूर आणि मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या अकाली जाण्याने दलित आदिवासी आंबेडकरी चळवळीची तसेच शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे
त्यांच्या पश्चात पत्नी संगीता जयवंत साळवे, शीतल व श्रद्धा साळवे या दोन मुली असा परिवार आहे मुंबई विद्यापीठ सिनेट समिती सदस्य बाळासाहेब साळवे यांचे ते बंधू होते