पद्मशाली सखी संघम’च्या ‘क्रियाशील पदाधिकारी व सदस्यपदी’ निवडीसाठी नांवनोंदणी सुरु!

.
‘सोलापूरातील पद्मशाली’ समाजाच्या महिला भगिनींना व्यासपीठाच्या माध्यमातून कर्तृत्व दाखवण्याची संधी.!
सोलापूर : सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन (रजि.) संचलित, ‘पद्मशाली सखी संघम’च्या २०२५ – २६ या एका वर्षाकरिता सोलापूरातील पद्मशाली समाजातील महिला भगिनींना नवीन क्रियाशील पदाधिकारी व सदस्यपदी निवड करण्यात येणार आहे, त्यासाठी नि:शुल्क (विनामूल्य) नांवनोंदणी सुरु करण्यात आले असून, यंदाच्या वर्षांपासून उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगार या माध्यमातून पद्मशाली महिलांना समृद्ध व भरारी देण्याचा छोटासा प्रयत्न करण्याचा मानस आहे, अशी माहिती संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.
नांवनोंदणीची अंतिम तारीख ‘५ ऑगस्ट’ पर्यंत असून यापूर्वी झालेल्या जुन्या महिला भगिनी सदस्यांनाही नोंदणी करण्याची संधी आहे. परंतू, ज्या भगिनी सदस्य होतील त्या सखी संघमच्या वतीने आयोजित उपक्रमांना उपस्थिती राहणे आवश्यक आहे. आज महिला विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत, त्यादृष्टीने महिलांना नवनवीन व्यवसाय करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्याबरोबरच महिलांना आर्थिक साक्षरतेबद्दल माहिती देणे, सक्षमीसाठी मार्गदर्शन, कर्जाविषयी माहिती, कायदेविषयक, सुरक्षासंदर्भात व सायबर गुन्ह्याबाबतीतही मार्गदर्शन, महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे उपक्रम, यासोबत विविध अभिनव सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नांवनोंदणी करण्यासाठी (9021551431) या क्रमांकाच्या व्हाटसअपवर पूर्ण पत्त्यांसह नोंदवावीत.
या संस्थेचे मुख्य उद्देश, महिलांना संघटीत करुन स्वावलंबी बनवणे. सदर संस्थेचे कार्य महिलाच नेत असल्याने त्या स्वतः सक्षम बनू शकतात. तसेच व्यवसाय करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत, फक्त काम करण्याची मानसिकता आवश्यक आहे. पूर्वी म्हणायचे, महिला शिक्षीत असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षीत होईल. पण आमचे धोरण असे की, महिला आर्थिक परिस्थितीने सक्षम झाल्यास संपूर्ण कुटुंबाला आधारवड तर होईलच. तसेच आर्थिक बचत करणे महिलांना जन्मजात ज्ञात आहे. पद्मशाली महिला भगिनींना या माध्यमातून सुरवातीला किमान दहा जणींना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून, तसेच महिलांमध्ये जिद्द व चिकाटी आहे, त्यांना योग्य दिशा देण्यासाठी, स्वंयसिध्द आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघमचे संस्थापक कोंडा यांनी असेही सांगितले.