राजुर येथील ॲड. एम.एन.देशमुख महाविद्यालयात ‘रतनगड’ या वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन

राजुर: -राजुर येथील ॲड. एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘रतनगड’ या वार्षिक नियतकालिक अंकाचे प्रकाशन ‘सत्यनिकेतन’ संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड.मनोहरराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष व उद्योजक मा.विवेकजी मदन उपस्थित होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
शै.वर्ष २०२४-२५ च्या ” रतनगड ” या अंकाची मध्यवर्ती कल्पना ‘आदिवासी, महिला व पर्यावरण’ अशी असून या या अंकात इंग्रजी,मराठी व हिंदी भाषांमध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लेख, कविता, पुस्तक परीक्षण आदी साहित्याचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती प्रास्ताविकात या अंकाचे संपादक प्रा. बबन पवार यांनी यावेळी दिली.
आपल्या प्रमुख भाषणात ॲड.मनोहरराव देशमुख म्हणाले की,”अशा नियतकालिकातील साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यात वाढ होते, व त्यांची वाचन क्षमता वाढते.हे नियतकालिक म्हणजे महाविद्यालयाच्या कामाचे प्रतिबिंब असून संपादक मंडळाचे काम अभिमानास्पद आहे ” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या अंकाविषयी मनोगत व्यक्त करताना ‘सत्यनिकेतन’ संस्थेचे सचिव एम.एल.मुठे यांनी समाधान व्यक्त करून संपादकांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ‘सत्यनिकेतन’ संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनीही आपले विचार मांडले. सत्यनिकेतन संस्थेचे माजी सचिव व माजी प्राचार्य टी.एन.कानवडे यांनीही ‘रतनगड’चा हा अंक दर्जेदार व सर्वोत्कृष्ट अंक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अंकाचे मुख्य संपादक प्रा. बबन पवार व मुद्रक सचिन नवले यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ‘सत्यनिकेतन’ संस्थेचे संचालक श्रीराम पन्हाळे, प्रकाश टाकळकर,भरत कचरे,रमाकांत डेरे,पत्रकार अजय पवार, संपादक मंडळातील सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रो.डॉ.द.के. गंधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.वाल्मिक गिते यांनी केले.