जनशक्तीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी

जनशक्तीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची ६५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.विद्याधर काकडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीचे शहर अध्यक्ष सुनील काकडे, विनोद मोहिते, रावसाहेब बर्वे, भरत जाधव, फुलचंद रोकडे, संभाजी साळुंके, मच्छिंद्र नारायणे, संतोष जाधव, विलास नवले, वसतिगृह विभागप्रमुख रविंद्र कुटे व शहरातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थीत होते.
यावेळी बोलताना अॅड.काकडे म्हणाले की, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम स्वच्छता, सामाजिक मागासलेपणा नष्ट करण्यासाठी गाडगेबाबांनी आपले उभे आयुष्य वेचले. गोरगरिबांच्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून बाबांनी गावोगावी विद्यालये व वसतिगृहे सुरू केली. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनाचा कॉ.आबासाहेब काकडे यांच्या कार्याशी सुसंगत असा प्रवास यावेळी त्यांनी विशद केला. कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्य करताना अनेक वसतिगृहाची स्थापना करून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे अतिशय उत्तम कार्य केले आहे असेही त्यांनी सांगितले.