सोनई येथील सुजाता इंटरनॅशनल स्कुल येथे स्वातंत्र्य दिन साजरा

विजय खंडागळे
सोनई, (15 ऑगस्ट) येथील सुजाता इंटरनॅशनल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज,सोनई या विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन महोत्सव पार पडला.
शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता झाली. सोनई परिसरातील CRPF सैनिक श्री अंबादास विश्वनाथ घुले यांच्या सह, सोनई पोलीस स्टेशनचे PSI श्री संजय मेडे सर सुजाता स्कुल चे संस्थापक श्री.किरण सोनवणे सर, वात्सल्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री बि एस सोनवणे सर, गणेशवाडी चे प्रगतशील शेतकरी श्री पंकज गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले व ध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये स्वसंरक्षणासाठी कराटे व विविध शौर्यगुणांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले तसेच सर्वांचे लक्ष भाषण आणि देशभक्तीपर वेशभूषा या कार्यक्रमाने वेधले.

दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच इयत्ता नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले व विविध गीतांवर नृत्य सादर केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक श्री किरण सोनवणे सर यांनी केले तसेच शाळेतील शिक्षिका ऐश्वर्या कळसकर मॅडम यांनी मार्गदर्शनपर भाषण केले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री विक्रम झिने सर यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व समजावून सांगितले व स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असे सांगितले, तसेच शाळेच्या प्राचार्या सौ ज्योती किरण सोनवणे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलच्या शिक्षिका सौ प्रांजल दरंदले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे शिक्षक श्री रोहित लाड सर यांनी केले व तसेच सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
