आजचे पंचांग व राशिभविष्य दि 27/12/2021

🙏 *सुप्रभात* 🙏
🍁 *आजचे पंचांग* 🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- *पौष ०६ शके १९४३*
दिनांक :- *२७/१२/२०२१,*
वार :- *इंदुवासरे(सोमवार),*
🌞सुर्योदय:- *सकाळी ०७:०१,*
🌞सुर्यास्त:- *सांयकाळी ०६:००,*
शक :- *१९४३*
संवत्सर :- *प्लव*
आयन :- *उत्तरायण*
ऋतु :- *हेमंतऋतु*
मास :- *मार्गशीर्ष*
पक्ष :- *कृष्णपक्ष*
तिथी :- *अष्टमी समाप्ति १९:२९,*
नक्षत्र :- *हस्त समाप्ति २९:०७,*
योग :- *सौभाग्य समाप्ति ०८:५२, शोभन ३०:५१,*
करण :- *बालव समाप्ति ०७:५४, तैतिल ३०:५४,*
चंद्र राशि :- *कन्या,*
रविराशि – नक्षत्र :- *धनु – मूळ,*
गुरुराशि :- *कुंभ,*
शुक्रराशि :- *मकर,*
राशिप्रवेश :- *राशिप्रवेश नाहीत,*
शुभाशुभ दिवस:- *उत्तम दिवस,*
✿राहूकाळ:- *सकाळी ०८:२३ ते ०९:४६ पर्यंत,*
♦ *लाभदायक वेळा*
अमृत मुहूर्त — *सकाळी ०७:०१ ते ०८:२३ पर्यंत,*
शुभ मुहूर्त — *सकाळी ०९:४६ ते ११:०८ पर्यंत,*
लाभ मुहूर्त — *दुपारी ०३:१५ ते ०४:३८ पर्यंत,*
अमृत मुहूर्त — *संध्या. ०४:३८ ते ०६:०० पर्यंत,*
❀ दिन विशेष:-
*कालाष्टमी,*
*————–*
🌏 *दैनिक राशीभविष्य* 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- *पौष ०६ शके १९४३*
दिनांक = *२७/१२/२०२१*
वार = *इंदुवासरे(सोमवार)*
*मेष*
निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.
*वृषभ*
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.
*मिथुन*
नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.
*कर्क*
हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.
*सिंह*
सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.
*कन्या*
आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.
*तूळ*
योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.
*वृश्चिक*
लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तू मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
*धनू*
सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.
*मकर*
मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.
*कुंभ*
नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
*मीन*
बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
*श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर*
*ता. करमाळा जि. सोलापूर*