बीरसा ब्रिगेड च्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पिचडांच्या नेतृत्वाची गरज नाही- मारुती मेंगाळ

आदिवासी नेत्यांच्या सहमती एक्स्प्रेस मधे मारुती मेंगाळ नाही
अकोले प्रतिनिधी
– आदिवासी समाजाला आपल्या मूळ संस्कृती चाली रिती रुढी परंपरा या आदिवासी संस्कृती पासून बीरसा ब्रिगेड नावाची संघटना आदिवासी समाजाचे लक्ष विचलित करुन आदिवासी समाजातील सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम करू नका आपली मूळ संस्कृती ही नाही अशा प्रकारचा नविन बागुलबुवा तयार करून बीरसा ब्रिगेड आदिवासी समाजात फूट पाडत आहे असे माजी मंत्री पिचड यांचे मत आहे आणि बीरसा ब्रिगेड च्या भूमिकेला आळा घालण्यासाठी सामाजिक मुद्दा करत मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील पिचड विरोधक आदिवासी नेत्यांची एकजूट करण्याचे प्रयत्न मंत्री पिचड यांचे सुरू आहे दोन दिवसापूर्वी रधा येथिल घोरपडादेवी मंदिरात पिचड भांगरे यांची बैठक झाली आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलो आहोत अशी भूमिका प्रसार माध्यमातून दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली त्या नंतर शिवसेनेचे मधुकर तळपाडे यांनी देखील या दोन्ही नेत्यांच्या सुरात सूर घालून त्यांनी देखील या आदिवासी नेत्यांच्या या प्रश्नावर सहमती एक्स्प्रेस मधे दाखल झाले मात्र शिव सेनेचे नेते माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी यांच्या सुरात सुर न घालता सरळ माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे
.त्यांनी म्हटले आहे की बीरसा ब्रिगेड संघटना आदिवासी समाजात जाऊन अखंड हरिनाम सप्ताह, दशक्रिया विधी, या सहित आदी धार्मिक कार्यक्रम करू नका आदिवासी संस्कृती पासून समाजाचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप माजी मंत्री पिचड यांनी बीरसा ब्रिगेड संघटनेवर केला आहे मात्र आजवर बीरसा ब्रिगेड संघटनेकडून अशा प्रकारचे काम केल्याचे कोणतेही पुरावे व्यक्तिगत आमच्याकडे आले नाहीत जर बीरसा ब्रिगेड संघटना चुकीच्या गोष्टी समाजात पसरवत असेल तर आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातील आदिवासी समाज या भूल थापांना बळी पडणार नाही . बीरसा ब्रिगेड संघटना आदिवासी समाजात फूट पाडत असेल आम्ही देखील त्यांच्या भूमिकेला कडक विरोध करू त्यासाठी माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखालीच जाऊन विरोध केला पाहिजे असं कोणी सांगितले आहे .अकोले तालुक्यात आमची पिचड विरोधक म्हणून ओळख झाली आहे जनतेने आम्हाला जी काही आजवर समाजकारणात उंची दिली ती पिचड समर्थक म्हणून नाही तर पिचड विरोधक म्हणून दिली आहे त्यामुळे प्रश्न कोणताही असो मात्र पिचड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कधीही काम करणार नाही . ज्या दिवशी बीरसा ब्रिगेड संघटनेचे असे काही पुरावे मिळतील त्या क्षणी त्या संघटनेच्या भूमिकेला आम्ही देखील विरोध करू त्या साठी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाची गरज नसल्याचे मेंगाळ यांनी सांगितले आहे तशी भूमिका स्पष्ट केले आहे …