राजूर येथील देशमुख महाविद्यालयात मुलींची हिमोग्लोबिन तपासणी!
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथील ॲड.एम.एन. देशमुख महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थिनींना दररोज महाविद्यालयात येणे जाणे शक्य होत नाही अशा मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा असून सध्या ५० विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत.
ओमायक्रोन या नव्या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय व आजाराचा प्रसार होऊ नये या हेतूने मुलींच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी व कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या प्रसंगी डॉ.मोरे (प्राथमिक आरोग्य केंद्र विठे) व त्यांचे सहकारी यांनी मुलींमधील हिमोग्लोबीन कमी असण्याची कारणे व उपाय, व सुदृढ आहार याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनींना दिली.तसेच प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी स्वच्छता व आरोग्यचे महत्त्व सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी फुला मॅडम (वस्तीगृह अधीक्षिका), प्रा. वलवे मॅडम, यांनी विशेष परिश्रम घेतले.

