सिनगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी .

बुलढाणा प्रतिनिधी
देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथील राजर्षी शाहू सार्वजनिक वाचनालयात आदर्श शिक्षक साने गुरुजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर पठाडे होते. तर कृषी सहाय्यक जगदीश बंगाळे वाचनालयाचे अध्यक्ष भगवान मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पठाडे वभगवान मुंढे यांनी साने गुरुजी यांच्या आदर्श जीवनाबद्दल माहिती विषद केली. कार्यक्रमाला शशिकलाबाई सिनगारे, कौशल्याबाई शिंगणे, इंदुबाई शेळके, कमलबाई लहाने, पुंजाबाई पठाडे, अंजना शेळके, शीतल चेके, मनमोहन बंगाळे, यशवंतराव पवार, कौतिकराव बंगाळे, सुरेश गोरे, श्रीकृष्ण बंगाळे,
देविदास पठाडे, साहेबराव पठाडे आदींची उपस्थिती होती