पारनेर तालुक्यात नवोदय मध्ये समन्वयाच्या अभावाने कोरोना चा प्रभाव!

नवोदय विद्यालयातील बाधितांची संख्या पोहचली 90 वर !
दादा भालेकर,
टाकळी ढोकेश्वर /प्रतिनिधी
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असणा-या अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील एकमेव असणारे जवाहर नवोदय विदयालय कोरोनाच्या विळख्यात सापडले असून कोरोना बाधीत विदयार्थ्यांच्या संखेत दररोज वाढत होताना दिसून येत असताना या निवासी विदयालयात कोरोना घुसलाच कसा?याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने याची चौकशी होण्याची गरज आहे. तालुक्यातील इतरही ठिकाणी असा प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सोमवार अखेर विदयालयातील कोरोना बाधीतांची संख्या ७० वर पोहोचली असून अजून ५० विदयार्थ्यांचे अहवाल प्रलंबीत असल्याने मंगळवार अखेर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहेत.

तथापी करोडो रूपये अनुदान असणा-या या केंद्र सरकारच्या विदयालयात शालेय व्यवस्थापन समिती व प्राचार्य यांचा समन्वयाचा अभाव दिसत येत असून कोरोना काळात घ्यावयाची काळजी अभाव दिसत असून एका बाकावर एकच विदयार्थी,सँनिटायझर,नँपकीन,मास्क,स्वच्छता,मुतारी,स्नानगृह,बेसींग चा अभाव असल्यामुळे व कोरोनाने हातपाय पसरल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असताना याकडे घटनेनंतरही तब्बल तीन दिवसांनी नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाँ.राजेंद्र भोसले यांनी लक्ष न दिल्यामुळे घडल्याची चर्चा पालक वर्गात आहेत.
तालुक्यात शाळा कॉलेज सुरू असून अनेक शाळा कॉलेजमध्ये प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे बैठक व्यवस्था नियमावलीप्रमाणे होत नाही स्कूल बस मध्ये गर्दी होत आहे जर नवोदय सारखाच हलगर्जीपणा इतरही विद्यालय झाला तर कोरोनाचा मोठा उद्रेक होऊ शकतो.
निवासी विद्यालय असल्याने विद्यार्थी त्या ठिकाणी राहत आहेत विद्यार्थी बाहेर गेले नाही मग येथे कोरोना आला कुठून नेमकं कशामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली या गोष्टींची चौकशी होणे गरजेचे आहे.
–
विद्यालयात विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे होते मात्र तसे झाले नसल्याने मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण वाढले आहेत
झालेला प्रकार हा गंभीर असून त्यामुळे कोरोना फैलाव होण्याची शक्यता आहे तालुक्यातील इतरही शाळा-कॉलेजमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाते का याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिका-यांनी दिली प्रथमच विदयालयास भेट…
एकीकडे संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना नवोदय विदयालयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाँ.राजेंद्र भोसले यांनी हे निवासी विदयालय सुरू करण्यापुर्वी प्राचार्यांना जे आदेश देण्याची गरज होती त्याकडे लक्ष न दिल्यामुळे कोरोनाने हातपाय पसरल्याने नाहक विदयार्थी यात कोरोना बाधीत झाले असल्याची खंत पालकांमधून व्यक्त होत आहे.
ओमायक्राँनचा अहवाल चार पाच दिवसांत भेटणार…
नवोदय विदयालयातील कोरोना बाधीतांचा आकडा ७० वर पोहोचला असल्यामुळे प्रशासनाने ओमायक्राँन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या तपासणीसाठी विदयार्थी व कर्मचा-यांचे स्त्राव नमुने पुणे येथील लँबला पाठविण्यात आले असून येत्या चार ते पाच दिवसांत अहवाल प्राप्त होईल असे तालुका आरोग्य अधिकारी डाँ.प्रकाश लाळगे यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात मंगळवारी सायंकाळी पुन्हा ८ विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
या कोरोना बाधितांमध्ये ६ विद्यार्थींनी व २ विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. त्यामुळे आता नवोदय विद्यालयातील कोरोना बाधितांचे संख्या ९० वर पोहोचली असून ४५ जणांचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आले होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांबरोबर ४ कर्मचारी बाधित झालेले आहे.
या विद्यालयातील विद्यार्थ्यांसह कर्मचारी कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो त्या ४५ जणांचे सोमवारी घेण्यात आले या ४५ पैकी ८ जण कोरोना बाधित झाले असून अजून दोन अहवाल प्रलंबित असलेची माहिती समजली आहे. त्यामुळे या नवोदय विद्यालय मध्ये कोरोनाचा विस्फोट दिवसेंदिवस वाढत चालला असून पालक विद्यार्थी व शिक्षकांना मध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुसरीकडे टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच अरुणा खिलारी यांनी नवोदय विद्यालयातील काही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य गावामध्ये राजरोसपणे फिरत असल्याची तक्रार विद्यालयाचे प्राचार्य व गटविकास अधिकारी किशोर माने यांचे कडे केली आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय हे निवासी विद्यालय असुन शुक्रवारी ९ कोरोनाबाधित आढळून आले होते.तर शनिवारी १० कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षक आढळून आले आहे.तर रविवारी सकाळी ३३ व सायंकाळी १९ कोरोना बाधित आढळून आले सोमवारी सायंकाळी १२ विद्यार्थी तर मंगळवारी ८ विद्यार्थी व शिक्षक कोरोना बाधित आढळून आले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे जवळपास ५०० च्या वर नमुने आरोग्य विभागाने घेतले होते.निवासी विद्यालयात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा आकडा वाढला असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.चार दिवसात बाधित विद्यार्थ्यांशी संपर्क आल्यामुळे ही संख्या वाढली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या ५ दिवसांपासून हा बाधितांचा आकडा वाढत चालल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
जानेवारी पर्यंत नवोदय विद्यालय प्रतिबंधित क्षेत्र जाहीर..
टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात पाच दिवसात जवळपास ९० विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले असून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी १०० मीटरपर्यंत २४ डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला आहे. त्यामुळे या विद्यालयातून कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य गावांमध्ये येऊ नये अन्यथा इतर कोणालाही त्या ठिकाणी जाण्यास ७ जानेवारीपर्यंत प्रशासनाच्यावतीने प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक आहे! –
आमदार नितेश लंके
आमदार निलेश लंके पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयाल जवाहर नवोदय विद्यालयातील कोरोना बाधित विद्यार्थ्यांची भेट घेतली व मानसिक आधार देत त्यांचे मनोबल वाढवून काळजी न करण्याच आवाहन केलं तसेच नवोदय विद्यालयात पण भेट दिली.पालकांनी व विद्यार्थीनी घाबरून जाऊ नये,काळजी करू नये. उपचारासाठी दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली जाईल,सर्वोतम उपचार केले जातील. जोपर्यंत विद्यार्थी कोरोनामुक्त होणार नाहीत, तोपर्यंत मी या विद्यार्थ्यांचा पालक असेेे आमदार लंके यांनी म्हटले आहे
टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात काल म्हणजेच २६ डिसेंबर अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तर आज पुन्हा एकदा याच नवोदय विद्यालयातील आणखी ९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.या विद्यालयातील बाधितांचा आकडा आता ९० वर गेला आहे.अजून आकडा वाढण्याची शक्यता असून, प्रशासनाला व आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.