आजचे पंचांग व राशिभविष्य दिनांक 30/12 /2021

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०९ शके १९४३
दिनांक = ३०/१२/२०२१
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.
वृषभ
संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.
मिथुन
नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.
कर्क
घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.
सिंह
नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.
कन्या
आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.
तूळ
कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.
वृश्चिक
मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू
कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.
मकर
अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ
तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
मीन
जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०९ शके १९४३
दिनांक :- ३०/१२/२०२१,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०२,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १३:४१,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २४:३४,
योग :- धृति समाप्ति २१:४९,
करण :- कौलव समाप्ति २४:१४,
चंद्र राशि :- तुला,(१९:०८नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पूर्वाषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,(०८:०१नं. धनु),
राशिप्रवेश :- शुक्र(व) – धनु ०८:०१,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०१:५४ ते ०३:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:०२ ते ०८:२४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३२ ते ०१:५४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०१:५४ ते ०३:१७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०४:३९ ते ०६:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
सफला एकादशी,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर