राज्यस्तरीय अधिवेशनात जिल्ह्यातील पत्रकाराचा उस्फुर्त सहभाग

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १६वे राज्यस्तरीय अधिवेशन गडकरी रंगयातन सभागृहात २८ डिसेंबर २०२१ रोजी उत्साहात पार पडले. राज्यस्तरिय अधिवेशनात राज्यासह इतर राज्यातून पत्रकार अधिवेशनात सहभागी झाले होते.
१६ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रिय मंत्री कपील पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य महासचिव विश्वासराव आरोटे, नवनाथ जाधव, कोकण विभाग प्रमुख ठाणे शहरप्रमुख नितीन मनोहर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. कोरोना महामारीच्या संकटांमुळे एक दिवशीय अधिवेशन दोन सत्रात घेण्यात आले. दोन्हीही सत्राला पत्रकांरानी उस्फुर्त प्रतिसाद दिला.पत्रकारांच्या समस्या, प्रिंट मिडिया व सोशल मिडियावरील नियमावलीमध्ये काही बद्दल होणे गरजेचे आहे. त्या विषयावर सर्वच मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. दोन्ही सत्रात आनेक मान्यवरांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारांचा सहभाग
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकर संघाचा वतीने ठाणे ( मुंबई ) येथे पत्रकरांचे १६ वे एकदिवशीय अधिवेशन मोठया थाटामाठात पार पडले. या अधिवेशनासाठी अहमदनगर जिल्हयातील आनेक सभासद पत्रकारांनी उपस्थित राहुन सहभाग नोंदवला.
दत्ताभाऊ पाचपुते
अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहमदनगर जिल्हा (दक्षिण )