देशविदेश

भंडारदऱ्याच्या पर्यटनावर नवं वर्षात कोरोना चे विरजन!

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
प्रतिकाश्मिर म्हणुन प्रसिद्ध असणा-या भंडारद-याच्या पर्यटन क्षेत्रावर यंदा नविन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पाठ फिरवली यामुळे भंडारद-याचा थर्टी फस्ट शांततेत गेला .पहिल्यांदाच भंडारद-याचा थर्टीफस्ट हा सुना सुना जाणवला
.


अहमदनगर जिल्ह्यात असणारे अकोले तालुक्यातील भंडारदरा हे पर्यटन क्षेत्र पर्यटकांचे माहेरघर मानले जाते .त्यातच नविन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा कायम पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल होत असतो .पंरतु यावर्षी कोविडचा ओमियोक्राॅन नावाचा विषाणुजन्य आजार डोके वर काढत असल्याने प्रशासनाने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी काही बंधने टाकली होती .त्यामुळे राजुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे व वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनीही येणा-या पर्टकांना आवर घालण्यासाठी कंबर कसली होती .

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी दरवर्षी पर्यटक टेंट कॅम्पिंग वर गर्दी करत असतात .पंरतु या टेंटधारकांची पोलिस व वनविभागाने बैठक घेत संगित वाद्य बंदीसह ब-याच गोष्टीवर बंदी घालण्याच्या सुचना दिल्या होत्या .मद्य सेवनावरही निर्ब॔ध घातले गेले होते . त्यामुळे अनेक पर्यटक हे भंडारद-याकडे फिरकलेच नाहीत तर अनेक टेंट धारकांनी बुकिंगच घेतली नाही .त्यामुळे यंदा मात्र भंडारद-याचा थर्टी फर्स्ट सुना सुना दिसुन आला .
कोविडने दोन वर्ष संपुर्ण जगात कहर केल्याने लाॅकडाऊन करण्यात आले होते .तर पर्यटनही बंद ठेवण्यात आले होते . त्याला भंडारदरा पर्यटन क्षेत्रही अपवाद नव्हते .पंरतु नियम शिथिल झाल्यानंतर भंडारदरा हे पर्यटनास खुले करण्यात आले .म्हणुन भंडारद-याला यावर्षी थर्टीफस्ट साठी गर्दीचा महापुर लोटेल असे वाटले होते .त्यामुळे भंडारद-यातील हाॅटेल्स व टेंटधारकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती . पंरतु भंडारद-याला यावर्षी शासनाने कडक निर्बंध लागु केल्याचा मेसेज अगोदरच पर्टकापर्यंत पोहचल्याने काहीशा कमी प्रमाणात पर्यटक भंडारद-यात दाखल झाले .नविन वर्षाचे स्वागत करताना काही अघटीत घडु नये यासाठी रिंगरोडवरील दोन्ही टोलनाक्यावर वनविभाग व पोलिस विभागाकडुन कडक तपासनी करण्यात येत होती .तर दोन्ही विभागाचे कर्मचारीही अभयारण्यात क्षेत्रात पेट्रोलिंग करताना आढळून आले .महाराष्ट्राचे शिखर कळसुबाई परीसरातही पर्यटकांची संख्या अल्प प्रमाणात दिसुन आली .तर रात्री बारा वाजता अगदी शांततेत नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले

.कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे , सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे , वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे ,उपनिरीक्षक नितिन खैरनार , पो . ना .दिलीप डगळे , अशोक काळे , अशोक गाढे , विजय मुढे यांच्यासह वनविभागाचे रविंद्र सोनार , भास्कर मुठे , महिंद्रा पाटील , चंद्रकांत तळपाडे , संजय गिते यांनी चोख बंदोबस्त बजावला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button