भारतीय ट्रायबल पार्टी च्या वतीने आझाद मैदानात धरणे आंदोलन

मुंबई– भारतीय ट्रायबल पार्टी महाराष्ट्र राज्य च्या वतीने महाराष्ट्र मधील नंदुरबार ,अहमदनगर ,ठाणे,पालघर,नाशिक , सह पुणे जिल्हातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मुंबई येथील आझाद मैदानात दिंनाक 7 फेब्रुवारी 2022 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे या मध्ये प्रमुख मागणी ट्रायबल एडवायझर कमिटीची बैठक राज्य सरकारने आजपर्यंत कमिटीची बैठक घेतली गेलेली नाही ती बैठक घेण्यात यावी तसेच डी बी टी योजना रद्द करावी आदिवासी शबरी व वित्त विभागाचे योजना पुन्हा सुरू करण्यात यावेत इत्यादी प्रमुख मांगण्यासाठी आझाद मैदान येथे विविध जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित होते


नंदुरबार जिल्हाध्यक्ष के.टी गावीत , बाळू गेंगजे ,पुणे जिल्हा ,अनिल तिटकारे सर पुणे जिल्हा प्रभारी तसेच सुरेश भाईक ,भास्कर कुडळ , किरण गावीत – नंदुरबार जिल्हा युवा सचिव ,वैभव लहांगे – डहाणू तालुकाध्यक्ष तसेच मुकेश लहांगे डहाणु तालुका सदस्य पालघर जिल्हाध्यक्ष अजय जाधव तसेच देवा भंडारी ,राजाराम लोहकरे ,सुरेश भाईक , ग्राम सेवा संस्थेचे अध्यक्ष हिरामण शेवरे सह अकोले तालुक्यातील भारतीय ट्रायबल पार्टी चे युवा नेते गणेश डगळे तसेच आंबेडकर वादी चळवळीचे अकोले तालुक्यातील सक्रीय कार्यकर्ते सुनिलभाऊ भद्रिके उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुनिताताई तुकाराम गेंगजे मुंबई व भारती बांगर उपस्थित होत्या