पाणीप्रश्नावरून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना येत्या काळात धडा शिकवा – अॕड. प्रतापराव ढाकणे

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
भालगाव जिल्हा परिषद गटातील मालेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन( 18 लाख), कीर्तनवाडी येथे बंधारा भूमिपूजन (15 लाख),खरवंडी येथील दोन शाळा खोल्या भूमिपूजन (18 लाख), जवळवाडी येथील अंगणवाडी लोकार्पण (7 लाख), शाळा खोली भूमिपूजन( 9 लाख), बंधारा भूमिपूजन (15 लाख) या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. हनुमंत शास्त्री होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्य शिला खेडकर, बाजार समिती संचालक वैभव दहिफळे, अनिल जाधव, सुनील खेडकर, मिथुन डोंगरे, शौकत शेख,सरपंच प्रदीप पाटील, कविता खाडे,अनंता खाडे, विष्णू थोरात ,युसुफ बागवान,महादेव जगताप, रावसाहेब पवळे,विश्वास खाडे आदी उपस्थित होते.
अॕड.ढाकणे म्हणाले की पाच वर्षात भालगाव जिल्हा परिषदेच्या गटात प्रत्येक गाव,वाडी-वस्तीसाठी निधी मिळून दिला.सुमारे 9 कोटी रुपयांची विकास कामे प्रत्यक्षात करून दाखवली. विरोधकांसारखा कागदावरचा निधी आणि हवेतील विकासकामे अशा थापा मारल्या नाहीत. निवडणुकांपुरते या परिसराचे बेगडी प्रेम दाखवून भावनिकतेचे राजकारण आम्हाला जमत नाही
. तीस वर्षे लोकांसाठी कायम रस्त्यावर आहे. निवडणुकीतल्या पराभवची चिंता करत नाही घरात बसणाऱ्यांपैकी मी नसून, जनतेवरील व मतदारसंघावरील अन्यायाविरोधात संघर्ष करायचे संस्कार आमच्यावर आहेत. भालगाव गटातील विकास कामासाठी प्रभावती ढाकणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवली. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी झाल्या. पुढच्या दहा दिवसात शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारानंतर त्या पुन्हा या परिसराचा दौरा करतील या भागाच्या जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्नावरून लोकांची दिशाभूल करणाऱ्यांना येत्या काळात धडा शिकवा असे ते शेवटी म्हणाले. मालेवाडी, किर्तवाडी, खरवंडी कासार व जवळवाडी येथील कार्यक्रमास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष महारुद्र कीर्तने यांनी केले तर आभार किरण खेडकर यांनी मानले.