मराठा समाजातील तरुणांनी उदयोग व्यवसायांकडे वळावे -चंद्रकांत महाराज लबडे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सध्याच्या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैली मध्ये निराश न होता मराठा युवकांनी छोटया मोठया व्यवसायाकडे वळावे व इतर समाजासमोर नवा आदर्श निर्माण करावा असे मत मराठा भुषण चंद्रकांत महाराज लबडे यांनी व्यक्त केले.
शेवगाव – नेवासा राजमार्ग वरील भातकुडगाव फाटयावरील सागर काळे व सुदाम खिलारे यांच्या मोरया मोटर्स अॅण्ड स्पेअर्स या वर्कशॉपचा शुभारंभ मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते, नवनाथ महाराज काळे, धुराजी महाराज काळे, संतोष महाराज पवार,माजी पोलीस अधिकारी डि.डि. गवारे, पोलीस अधिकारी रविंद्र कर्डिले, पाथर्डीचे नायब तहसिलदार गुंजाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
. मनामध्ये ध्येय धरून चिकाटी व प्रामाणिकपणा अंगीकृत केला तर तुम्हाला कोणत्याही व्यवसायात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आता प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. असेही मत त्यांनी मानले.
यावेळी कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे, राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल बेडके, भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, भातकुडगावचे सरपंच अशोक वाघमोडे, उपसंरपच विठठल फटांगरे, हिंगणगाव -ने चे सरपंच महादेव पवार, प्रताप चिंधे, संतोष मेरड, नाना काळे, राजेश लोढे, बबन बडे, दिंगबर पवार,रमेश काळे, बंडु पवार, कैलास जाधव उध्दव मेरड, दत्तात्रय पवार,अनिल मेरड, सचिन काळे, देवदान वाघमारे, दत्ता सांवत, अरुण खिलारे, सचिन मेरड, पत्रकार शहाराम आगळे, अमोल मेरड, भाऊराव फांटागरे, महादेव वाघ,सुखदेव काळे, बाळासाहेब बडे, संदिप काळे, यांच्या सह व्यवसायिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थिताचे आभार गोरक्षनाथ महाराज मिझे यांनी मानले.
चंद्रकांत लबडे यांचा गौरव
चंद्रकांत महाराज लबडे यांना मराठा भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भातकुडगाव फाटा येथील व्यवसायिकच्या वतीने राजेश लोढे यांच्या हास्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यवसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.