डोंगरगाव येथे बाल हक्क आणि लैंगिक स्पर्श शिक्षण कार्यशाळा संपन्न…
गणोरे प्रतिनिधी :-
सारथी फाउंडेशन संगमनेर व मालपाणी विधी महाविद्यालय संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने,
श्रमशक्ती विद्यालय ,मालदाड येथे बाल हक्क व लैंगिक स्पर्श शिक्षणाबाबत शालेय विद्यार्थ्यांना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत संस्थेमार्फत मुलांमध्ये जागरूकता आणण्यासाठी मुलांना वैयक्तिक सुरक्षेचे शिक्षण दिले जाते .यामधून त्यांच्यातील नेतृत्व गुण, धाडसी वृत्ती ह्या कौशल्यांचा विकास व्हावा आणि ते स्वत:च्या शारीरिक, मानसिक व सामाजिक बाबतीत योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनावीत यासाठी वैयक्तीक सुरक्षा शिक्षण, समुपदेशन यावर या संस्थेमार्फत विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सदर विषयावर सत्रे घेतली
आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक मुलांसोबत पूर्ण वेळ राहू शकत नाही, म्हणून पालकांनी मुलांना त्या विषयीचे शिक्षण, वैयक्तिक सुरक्षेची कौशल्ये शिकून अनैतीक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. यासाठी पालक व शिक्षक ह्यांना सोबत घेऊन मुलांना चर्चात्मक व खेळात्मक पद्धतीने माहिती दिली जाते .
सर्व प्राध्यापक व सारथीच्या स्वयंसेवकांचे स्वागत व सत्कार येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.रोहिदास डोंगरे यांचे वतीने करण्यात आले.यावेळी मा.तुपे मॅडम ,मा.नवले सर व विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक मा.जीवराज आंधळे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे नियोजन सारथी फाऊंडेशनचे प्रकल्पप्रमुख मा.मंगेश वाघमारे व मा.अजित फापाळे यांनी केले होते.तसेच मा.ईश्वर डुबे ,मा.प्रिती नवले ,मा.आशिष शिंदे,मा.शरयू सोनवणे,मा.शुभम पवार मा. वैभव नेहे
मा.महेश घुले, मा.कावेरी पडवळ,मा.श्रीकांत पवार ,मा.शितल दिघे ,मा.आरती आव्हाड, मा.ऋषिकेश जोंधळे या सर्वांच्या उत्तम नियोजनाने कार्यशाळा प्रभावीपणे पार पाडली. सदर कार्यशाळेसाठी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.राहुल देशमुख व सारथी फौऊंडेशनचे अध्यक्ष मा.अक्षय बोंबले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले