महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय प्रदेश कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब भाकरे यांची निवड…..!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भूमिपुत्र तथा महावितरण विभागातील अधिकारी भाऊसाहेब भाकरे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड झाली
रविवार दि. २ जानेवारी २०२२ रोजी पुणे येथील उरुळी कांचन येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली तसेच वार्ता परिवार कल्याण प्रादेशिक कार्यालयाच्या अध्यक्षपदी माऊली बडधे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी संघटनेचे सरचिटणीस जाहिरोद्दीन सय्यद साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच संघटनेचे अध्यक्ष एन.के. मगर, माधव पटारे, विष्णू घोडके, सोमनाथ हिंगरे, वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेचे अहमदनगर येथील अध्यक्ष बाळासाहेब वामन यांच्यासह आदी अधिकारी व पदाधिकारी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ तात्या हाड यांनी केले तर आभार बाळासाहेब वामन यांनी मानले.