नेप्तीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, नेप्ती ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा केला सन्मान.

अहिल्यानगर:–नगर तालुक्यातील नेप्ती येथे समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मोरे गुरुजी, रामदास फुले, विजय कर्पे, सचिन दरेकर, विलास बेल्हेकर व अन्य मान्यवरांनी सावता महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर केला .नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून काढलेल्या प्रभात फेरीतून देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. भारत माता की जय घोषणांनी गावचा परिसर दणाणून काढला.प्रभात फेरीतून विद्यार्थ्यांनी स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. समीक्षा राऊत ,मोनिका चौरे, सानवी होले, यांनी झेंड्या भोवती आकर्षक रांगोळी काढली . तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे गायन केले . ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपसरपंच अनिता चौगुले यांच्या हस्ते तर श्रीराम मंदिरा समोर मंडळाचे अध्यक्ष बबन फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . नेप्ती विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन होळकर यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळेत सरपंच सविता संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सावता महाराज मंदिराच्या पटांगणात समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजवंदनाचा मान दिल्याबद्दल रामदास फुले यांनी सावता महाराज तरुण मंडळाचे व ग्रामस्थांच्या आभार मानले.

यावेळी माजी सरपंच संजय आसाराम जपकर, संजय अशोक जपकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे, भानुदास फुले, शाहूराजे होले ,लक्ष्मण कांडेकर ,दत्ता कदम ,उपसरपंच जालिंदर शिंदे, पाराजी चौरे, दादू चौगुले, फारुख सय्यद ,पोलीस पाटील अरुण होले, संस्थेचे अध्यक्ष ॲड धर्मा जपकर ,बबन फुले, विनायक बेल्हेकर, दत्ता कळमकर ,अशोक पवार, मुख्याध्यापक महेश जाधव, पदमा मांडगे ,सुरेश कार्ले, निर्मला कांडेकर ,आशा ढोले, नूतन पाटोळे, मीना काटमोरे, ,वसंत पवार , शिवाजी होळकर, अमोल चौगुले, अभिजीत जपकर ,दत्ता कांडेकर,ग्रामसेवक शेख भाऊसाहेब कृषी अधिकारी नानासाहेब नवले ,बाबासाहेब भोर, अश्विनी पवार, गोरख कोतकर, संतोष खरमाळे , सीमा कोतकर, बाबुराव सय्यद ,नानासाहेब घोडके ,सुनीता परभणे, राजेंद्र झावरे, राजू सांगळे ,श्रद्धा भांड शिक्षक ,विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीपर गीते कवायत, झांज पथक आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेतली.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करून सन्मान करण्यात आला . ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये खाऊचे वाटप करण्यात आले .