राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २/३/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ११ शके १९४३
दिनांक = ०२/०३/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
अधिकारी लोकांची गाठ पडेल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. गप्पिष्ट लोकांचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडता येतील.  व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवा.

वृषभ
कामात खंड पडू देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा राहील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामातून समाधान शोधावे.

मिथुन
कलेसाठी लागणारे साहित्य खरेदी कराल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.

कर्क
घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शांत व संयमी विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. भावंडांची काळजी लागून राहील. धार्मिकतेत चांगली वाढ होईल.

सिंह
प्रवासाचा आनंद घ्याल. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. अचानक धनलाभ संभवतो. कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल. भागिदारीतून चांगला लाभ होईल.

कन्या
गोष्टी मनाजोग्या जुळवून आणाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. मोकळ्या वातावरणात रमून जाल. चटपटीत पदार्थ खाल.

तुळ
सर्वांशी  खिलाडु वृत्तीने वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सतर्कता बाळगावी. गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

वृश्चिक
पराक्रमाला चांगला वाव मिळेल. हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. खाण्या-पिण्याची पथ्ये पळावीत. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान शोधावे.

धनू
स्पष्ट, पण खरे बोलाल. घरगुती कार्यक्रम काढले जातील. जुनी येणी वसूल होतील. घरातील स्वच्छता  आवडीने कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

मकर
कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. हस्तकलेसाठी वेळ काढावा. नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर काळजी घ्यावी.

कुंभ
वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कामाची घडी नीट बसवावी. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काही खर्च आकस्मिक होऊ शकतात.

मीन
आवडीनुसार कपडे-लत्ते खरेदी कराल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. प्रेमाची दृष्टीने चांगली मैत्री लाभेल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने लाभ घ्याल. आकर्षणाला बळी पडू नका.

:🙏 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ११ शके १९४३
दिनांक :- ०२/०३/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३४,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २३:०५,
नक्षत्र :- शततारका समाप्ति २६:३७,
योग :- शिव समाप्ति ०८:२०, सिद्ध २९:४२,
करण :- चतुष्पाद समाप्ति १२:००,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारका,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:४१ ते ०२:१० पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:४९ ते ०८:१७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:१७ ते ०९:४५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१३ ते १२:४१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०६ ते ०६:३४ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
दर्श अमावास्या, युगादि, अन्वाधान,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button