काळेवाडीकरांचा डोंगर दर्यांचा प्रवास थांबणार

जिल्हा परिषद मार्फत रस्त्याचे काम सुरू! सभापती काशिनाथ दाते यांचा पुढाकार
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील देसवडे येथील बोरमाळी ते काळेवाडी या डोंगर घाटातून सुरू असलेल्या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या निधीमधून मंजूर करण्यात आले असून या रस्त्याचे काम सुरू झालेले आहे. दरी खोऱ्यांमध्ये वसलेल्या देसवडे या गावच्या काळेवाडी या वस्तीला जोडणारा हा रस्ता असुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येऊन काळेवाडीकरांचा डोंगर दर्यांचा सुरू असलेला प्रवास लवकरच थांबणार आहे. यापूर्वी या ठिकाणी रस्ता अस्तित्वात नव्हता हा रस्ता हा सभापती काशिनाथ दाते सर यांच्या कल्पनेतून तयार झालेला आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर काळेवाडीकरांना प्रवास सुखकर होणार आहे. काळेवाडीकडे जायचे असेल किंवा काळेवाडी वरून देसवडे येथे यायचे असेल तर दरी खोऱ्यांमधून, डोंगरातून वाट काढीत प्रवास करावा लागत असे, शाळा महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रवास रोजचाच असायचा. वृद्ध तसेच लहान बालके, शाळकरी मुले यांच्या होणाऱ्या दयनेचा विचार न केलेला बरा. पावसाळ्यात तील स्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी. देसवडे येथील बोरमळी ते काळेवाडी हा रस्ता तयार करण्यासाठी बांधकाम व कृषी समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी पुढाकार घेतला आणि हा रस्ता करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस मधून २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत अनावश्यक खर्चाला फाटा देवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी सांगितले. या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून महिला, युवक आणि वयोवृद्धांनी सभापती काशिनाथ दाते यांचे आभार मानले आहे. शुक्रवारी या कामाची पाहणी काळेवाडी येथील युवकांसमवेत केली.
काळेवाडी, बोरमळी, टेकडवाडीची लोकवस्ती ७०० इतकी आहे. रस्ता नसल्याने या नागरिकांना दररोजचा संघर्ष करावा लागत असे, रस्ता तयार करून या नागरिकांचा प्रवास सुसहाय्य करण्यासाठी सभापती दाते यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रस्त्याची पाहणी करताना शिवसेनेचे युवा उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, शाखाप्रमुख बाजीराव शिंदे, योगेश दाते, मच्छिंद्र गुंड, सिताराम दाते, बाळू गुंड, नानाभाऊ दाते, कृष्णा दाते, सुभाष टेकुडे, तुकाराम तोडकर, निलेश भोर, गणेश भोर, बबन गुंड, शिवाजी गुंड, सकाहारी दाते आदी उपस्थितीत होते.