
अकोले, प्रतिनिधी
अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड यांना कोरोना ची बाधा झाली आहे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली सुरुवातीला राजूर येथे त्यानंतर अकोले येथे केलेल्या दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने खबरदारी साठी त्यांनी उपचारासाठी मुंबईला जाण्याची ठरविले
कोरोना संक्रमित झाल्याने त्यांना अकोले येथील डॉ. भांडकोळी यांच्या हॉस्पिटल येथून मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी हलविले आहे. राजूर येथून मुंबईकडे जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .
नगरपंचायत निवडणुकीत सातत्याने मतदारांशी संपर्क साधत असताना माझ्याकडुन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते त्यात त्रुटी राहिल्याने मी आज सकाळी पॉझीटीव्ह निघालो आहे.आज तातडीने राजूर येथील डॉ.बाबासाहेब गोडगे,डॉ.दिघे व अकोले येथील हरिश्चंद्र रुग्णालयात डॉ.भांडकोळी यांचेकडून तपासण्या केल्या आहेत .मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मी तातडीने मुंबई येथे जात आहे.माझ्या संपर्कात ज्या व्यक्ती आल्या असतील त्यांनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीअसे आवाहन त्यांनी केले
.तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या मध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष्य घालेल .तर कोरोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकाने आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी .नगरपंचायत निवडणुकीत मला जनतेने दिलेला प्रतिसाद दिला उद्याच्या चार प्रंभागातील मतदारांनी भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आपले आशीर्वाद द्यावेत असे सांगत
शनिवारी सायंकाळी सहा वाजता वैभव पिचड मुंबईकडे रवाना झाले.