विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
राजापूर महाविद्यालयात ओम फुड्स अँड नॅचरल्स या हर्बल कंपनीबरोबर झाला सामंजस्य करार…….
.
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर तसेच ओम फुड्स अंड नॅचरल्स या स्पिरुलिना उत्पादक कंपनी बरोबर दिनांक सहा जानेवारी 2022 रोजी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुजाता मंडलिक मॅडम तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आर पी हासे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार झाला
. याप्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुभाष वर्पे सर तसेच IQAC कॉर्डिनेटर संगीता जांगिड मॅडम, सब कॉर्डिनेटर सविता हासे मॅडम व शीतल वाकचौरे मॅडम उपस्थित होत्या.
सदर करारानुसार महाविद्यालयामध्ये विविध कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना
कौशल्याभिमुख ट्रेनिंग देण्याचे नियोजित करण्यात आले.