आमदार डॉ.लहामटे म्हणाले …मी १५ दिवस गुहेत राहिलो!

डॉ. एस. के. सोमण अकोले गौरव पुरस्काराने सन्मानित!
अकोले प्रतिनिधी
जनावरे चारण्यासाठी हरिश्चंद्रगडावर मी पंधरा दिवस गुहेत राहिलो पाचनई कडील हरिश्चंद्रगडावरील सरपंचाची गुहा (गडद) अतिशय सुंदर आहे या ठिकाणी गुहे वरील रिव्हर्स फॉल मुळे पाऊस उघडला की नाही हे देखील समजत नाही मी पंधरा दिवस हरिश्चंद्रगडावरील या गुहेत राहिलो असे सांगत अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ किरण लहामटे यांनी आपल्या बालपणातील आठवणी जागवल्या
अकोले तालुक्याला अतिशय सुंदर निसर्ग संपदा लाभली आहे पत्रकारांनी अकोले तालुक्यातील ही सुंदर निसर्गसंपदा जगासमोर आणावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले
अकोले तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गीते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते
आमदार लहामटे पुढे म्हणाले की पत्रकारांनी त्यांचा अधिकार जनतेसाठी वापरला पाहिजे मात्र पत्रकारिता ही आग भडकवणारी नसावी द्वेष भावनेने केलेली पत्रकारिता एका दिशेला जाते त्यातून समाजाचे हित साधले जात नाही पत्रकारिता दोन्ही बाजूंचा विचार करणारी व समाजाला प्रोटेक्ट करणारी असावी ,फुले-आंबेडकर आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जनतेसाठी पत्रकारिता केली त्यांचा आदर्श जपला पाहिजे असे आमदार लहामटे म्हणाले
पत्रकार संघाने या वर्षीचा अकोले गौरव पुरस्कार कोतुळ येथील डॉ. एस. के. सोमण यांना जाहीर केला . आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ सोमण यांना यावेळी प्रदान करण्यात आला

जादूच्या प्रयोगातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अंधश्रद्धे विषयी प्रबोधन करणारे व मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झालेले जादूगर पी बी हांडे,राज्य शासनाचा आदिवासी सेवक व दलित मित्र पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक,अकोले तालुका वारकरी संप्रदायाचे अकोले तालुका अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज शेटे, नाशिक रोटरी कलब ऑफ नाशिक चा दर्पण पुरस्कार मिळाल्या बद्दल पत्रकार सुनील गीते याचा तसेच पिंगळा चित्रपटात प्रमुख भूमिकेतील रमेश खरबस यांचा यावेळी सन्मान करण्यात आला
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा ला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी जादूगार पी बी हांडे, ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, वारकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ह भ प विश्वनाथ महाराज शेटे, डॉ सुभाष सोमण, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील गीते ,प्रा बाळासाहेब मेहेत्रे, श्रीनिवास रेणुकादास यांनी मनोगत व्यक्त केले संघाचे सेक्रेटरी प्रवीण धुमाळ व रमेश खरबस यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले
याप्रसंगी पत्रकार गोकुळ कानकाटे नंदकुमार मंडलिक, राजेंद्र जाधव, विलास तुपे विनायक घाटकर,आबासाहेब मंडलिक, संजय उकिरडे हरिभाऊ आवारी , राजेंद्र उकिरडे, विनय समुद्र ,अण्णासाहेब चौधरी ,युवराज हंगेकर राजेंद्र देशमुख,जयराम धादवड आदी उपस्थित होते