कातळापूर विदयालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

संघर्ष व्यक्तीला मजबूत बनवतो- विवेकजी मदन.
अकोले/प्रतिनिधी-
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर यश मिळते.जे संघर्ष करून लढतात तेच जिंकतात.कारण संघर्ष व्यक्तीला मजबूत बनवतो.असे विचार सत्यनिकेतन संस्थेचे कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनी प्रतिपादीत केले.
नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापूर विदयालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी विवेकजी मदन प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावरून बोलत होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक विजय पवार हे होते.
यावेळी केंद्रप्रमुख पुनाजी धांडे,शिक्षण निरिक्षक लहानु पर्बत,रविभाऊ,सरपंच बाळासाहेब ढगे,बुवाजी कुलाळ,निवृत्ती तातळे,पुनाजी ढगे,अधिक्षक वाळू धिंदळे, मुख्याध्यापक बादशहा ताजणे,जेष्ठ शिक्षक संपत धुमाळ,अनिल पवार,गोरक्ष मालुंजकर, किशोर देशमुख,मिना गाडे,धनंजय मोहंडूळे,अनिता जंबे यांसह पालक, विदयार्थी उपस्थित होते.
विवेकजी मदन यांनी पुढे मार्गदर्शन करताना आभ्यासाबरोबर खेळाला देखील महत्त्व दया.पुस्तकी ज्ञानाबरोबरच चांगले मित्र असावेत त्यातुनच विकास साध्य होतो.असा आशावाद व्यक्त करत वाढदिवस साजरा केल्याने हृदयस्पर्शी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पवार यांनी पारितोषिके जिवनात परिवर्तन घडवून आनतात.बक्षिसे हे चांगले वर्तन आणि स्पर्धात्मक भावनेला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग आहे.कष्टाने स्वतःचे भविष्य घडवा.स्वतःला सिद्ध करा.ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे,त्याचा भविष्यकाळ उज्वल असतो असे विचार व्यक्त केले.
सरपंच बाळासाहेब ढगे यांनी कपाळावरचे यश दिसत नाही ते घडवावे लागते.सहन करायला शिका.जिद्द,चिकाटी महत्त्वाची आहे.कष्टाशिवाय फळ नाही असे मत व्यक्त केले.
केंद्रप्रमुख पुनाजी धांडे,लहानु पर्बत, बुवाजी कुलाळ यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी विदयार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. माजी सचिव कै.मोहन घिगे यांच्या स्मरणार्थ इ.१०वी.बोर्ड परिक्षेत प्रथम तिन विदयार्थ्याना रोख रक्कम व ट्रॉफी,प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांनी केले.सुत्रसंचलन प्रा.सचिन लगड यांनी केले.तर किशोर देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचा शेवट किशोर देशमुख यांनी पसायदानाने करण्यात आला .
———-