शिष्यवृत्ती परीक्षेत मिडसांगवी ची प्रगती हजारे गुणवत्ता यादीत

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
खरवंडी (कासार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिडसांगवी (ता. पाथर्डी) शाळेची गुणवत्तेची परंपरा कायम राखत. शाळेची विद्यार्थिनी कु. प्रगती दत्ता हजारे हिने पूर्व उच्च प्राथमिक ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्ट 2021, इ.5वी मध्ये प्रगती ने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तिच्या यशाबद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रगतीचा यथोचित सन्मान करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिडसांगवी ग्रामपंचायतचे सरपंच भगवान हजारे हे होते. या कार्यक्रमासाठी मिडसांगवी ग्रामपंचायतचे उपसरपंच विष्णू थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश हजारे, शिवाजी पठाडे, दत्ता हजारे, पंडित पठाडे, मिरा खोमणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रगतीला मुख्याध्यापक , वर्गशिक्षक बंकटराव बडे मुख्याध्यापक कल्याण कराड,, ज्ञानेश्वर वाघ, वाल्मिक बडे, दीपक महाले, मंजुषा कानडे मॅडम, धर्मप्रसाद जोशी, मनिषा खेडकर मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर वाघ यांनी, सूत्रसंचलन व्यंगचित्रकार दीपक महाले यांनी, तर आभार धर्मप्रसाद जोशी यांनी मानले.
सदर यशाबद्दल सालसिद्धबाबा संस्थानचे महंत ह.भ.प हनुमंत शास्त्री महाराज, माजी सरपंच दत्तूनाना पठाडे, केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे , गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ यांनी कु.प्रगती हजारे हिचे अभिनंदन केले आहे.