दिन विशेष पंचांग व राशिभविष्य दि.१५/१०/२०२३

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २३ शके १९४५
दिनांक :- १५/१०/२०२३,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०६,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २४:३३,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति १८:१२,
योग :- वैधृति समाप्ति १०:२४,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति १२:०२,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – चित्रा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. १०नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:३८ ते ०६:०६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:४७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:४३ ते ०३:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:
घटस्थापना, नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, इष्टि,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २३ शके १९४५
दिनांक = १५/१०/२०२३
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
वृषभ
कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अति विश्वास टाळावा. सर्व गोष्टींचा आढावा घ्यावा.
मिथुन
जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील. करिअर बदलला काळ अनुकूल. कामासंदर्भात तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल.
कर्क
भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल. एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
सिंह
तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अति उत्साहात निर्णय घेऊ नका. कामाची पूर्व तयारी करावी लागेल.
कन्या
घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. मानसिक ताण वाढू देऊ नका. जोडीदारापासून गोष्टी लपवू नका. प्रेमातील व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी.
तूळ
घरासाठी पैसा खर्च कराल. मित्रांचा प्रभाव राहील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडाल.
वृश्चिक
जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी. मनातील इच्छा प्रबळ राहील. काही मूलभूत गोष्टीत परिवर्तन करावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी प्राधान्याने पार पाडाल.
धनू
सामाजिक मान वाढेल. घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारण्याची प्रबळ इच्छा होईल.
मकर
व्यायामाची संगत सोडू नका. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल. शारीरिक अस्वस्थता कमी होईल. मुलांच्या इच्छा जाणून घ्याव्यात. खरेदीचे योग आहेत.
कुंभ
भावनिक गुंतागुंतीत अडकू नका. आपले कर्तृत्व दाखवून द्या. मनोरंजनात वेळ घालवा. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. जोडीदाराची साथ मिळेल.
मीन
अनाठायी खर्च वाढू शकतो. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर