पिंपरकणे डोंगरवाडी ,आढळ वाडी , देवगाव येथिल रस्त्यांच्या कामासाठी अंदाजित 65 लक्ष रुपये निधीची तरतूद …..
सौ सुषमाताई दराडे ….
अकोले प्रतिनिधि
– अकोले तालुक्यातील समशेरपुर गटात माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमाताई दराडे यांच्या मध्यांतून या जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामे मार्गी लागत आहे गेली अनेक दिवसांपासून या गटांमध्ये विकास कामांचे उद्घाटन सुरू आहेत आज पुन्हा या भागातील पिपरकणे येथिल अनेक वर्षांपासून प्रलंबित आढळवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यासाठी 15लक्ष तसेच पिपरकाने गवठा येथे आरो प्लांट स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी 7लक्ष त्याचप्रमाणे डोंगरवाडी येथिल रस्त्यासाठी 30लक्ष व देवगाव येथिल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक ते आढळवाडी रस्त्यासाठी 13 लक्ष रुपये तरतूद केली असून आज प्रत्यक्षात या सर्व विकास कामाचे उद्घाटन संपन्न झाल्याचे जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमाताई दराडे यांनी सांगितले .
पिपरकाने डोंगरवाडी येथिल रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता या भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आज अखेर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यासाठी तब्बल 13 लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे त्याच प्रमाणे या गावातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून अारो प्लांट साठी 7लक्ष तसेच या गावातील डोंगर वाडी येथिल रस्ता अत्यंत खराब झाला होता सदरील रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले आहे या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 30 लक्ष रुपये तर देवगाव येथिल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या जवळ रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला आहे या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत हा रस्ता देवगाव, खिरविरे, एकदरे, टाकेद या गावांना जोडणारा असल्याने या ग्रामीण रस्त्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने हा रस्ता अत्यंत खराब आहे या रस्त्यासाठी स्थानिक विकास निधीतून 13 लक्ष रुपये निधीची तरतूद केली आहे या कामाचे उद्घाटन प्रत्येक्षात उद्घाटने संपन्न झाली त्याच प्रमाणे या गणातील पंचायत समिती सदस्य देवराम सांमिरे यांच्या स्थानिक विकास निधीतून देवगाव येथे विठल रुख्मिणी मंदिर समोर पेव्हीग ब्लॉक तसेच या मंदिर लगत पत्रा शेड या कामाचे लोकार्पण करण्यात आले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, डॉ विजय पोपरे, पंचायत समिती सदस्य देवराम सामिरे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश पथवे, सचिव बाळासाहेब मधे, राजू पिचड, चैनु म्हाशाळ, किरण पिचड , हेमंत पिचड, गणपत थिगळे , या सहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते
