लायन्स क्लब फ्युचर पुणे यांचे वतीने ७५ गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

राजूर /प्रतिनिधी-:
. अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे लायन्स क्लब पुणे,दिपकभाई शहा तळेगाव,मुकुंदनगर, शताब्दी, संगमनेर यांचेकडून देशाच्या ७५ व्या आमृतमोहत्सवा निमित्त विदयार्थ्यांना ७५ मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले.सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पायपीट करत खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिरात येणाऱ्या ७५ मुलामुलींना मिळाला लायन्स क्लब पुणे फुच्यर आणि तळेगाव लायन्स क्लबचा सायकलींचा आधार.या प्रसंगी लायन अशोक मिस्त्री अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी लायन मयुर राजगुरव,डॉ. शाळीग्राम भंडारी , रोहीणी नागवणकर,सुनिल रोक,मेघा अंबवले,दिलीप अंबवणे, प्रमिला वाळुंज, नंदकुमार काळोखे,सुनिल वाळुंज,डॉ.सचिन पवार, प्रकाश पटेल, सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे, संचालक विजय पवार, श्रीराम पन्हाळे,नंदकिशोर बेल्हेकर, व्यवस्थापक प्रकाश महाले, दिनेश शहा, महाविद्यालय प्राचार्य भाऊसाहेब देशमुख, संजयकुमार शिंदे,शामराव साबळे यांसह त्रिंबक पराड, काळु बेणके, पंढरी बेणके, यांसह पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्ष लायन अशोक मिस्त्री यांनी पुढे मार्गदर्शन करताना समाजाचे उज्वल भविष्य घडवा, योग्य दिशा ठरवा.अंतरमनाचा आवाज ओळखा.स्वतःवर विश्वास ठेवा जीवनात यशस्वी व्हाल असे मत व्यक्त करत दिपक भाई शहा तळेगाव तसेच गुरूजन, विदयार्थी, त्यांचे आई वडील यांचे विशेष आभार व्यक्त केले.
सचिव टि.एन.कानवडे यांनी कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे.जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचे बळ देते. याच आत्मविश्वासाने चाळीसगाव डांगानात दळणवळण पोहचले. त्यामुळे शिक्षणाची गंगा खेडेगावापर्यंत पोहचल्याचे विचार प्रतिपादीत केले. सायकल वितरीत केल्यानंतर विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांच्या दुःख सांगताना प्राचार्य लहानु परबत यांना भावना दाटून आल्या.कार्यक्रमाचे स्वागत लायन मयुर राजगुरव यांनी तर प्रास्ताविक लायन वृषाली गानू यांनी केले. सुत्रसंचलन दिपक पाचपुते व नानासाहेब शिंदे यांनी केले तर प्राचार्य लहानु पर्बत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदयालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी आदींनी परीश्रम घेतले.
