भारतीय राष्ट्रवादाचे प्रवर्तक स्वामी विवेकानंद – प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
: ” स्वामी विवेकानंद हे भारतीय राष्ट्रवादाचे प्रवर्तक असून त्यांनी ब्रिटिश राजवटीतील भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रज्वलित केली होती” असे प्रतिपादन पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रोफेसर डॉ. तुकाराम रोंगटे यांनी व्यक्त केले
. ते राजूर येथील एम.एन.देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग आयोजित स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,” ब्रिटिश राजवटीतील भारतीयांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली असताना विवेकानंदांनी भारतीयांमध्ये राष्ट्रभक्ती चे स्फुल्लिंग चेतवण्याचे महान कार्य केले”
या प्रसंगी प्रा. बबन पवार आपल्या भाषणात म्हणाले की,” राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला मातृभूमीवर प्रेम करायला शिकवले व गुलामगिरीविरुद्ध चीड निर्माण केली. यातूनच महाराष्ट्राला परकीय गुलामगिरीतून मुक्त करणारा पराक्रमी, न्यायी व नीतिमान छत्रपती राजा मिळाला. छत्रपती शिवरायांच्या राजमाता जिजाऊ याच शिवरायांच्या खऱ्या गुरु होत्या. म्हणून जिजाऊंना राष्ट्रमाता पदवीने गौरवले जाते.” अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी” केवळ थोर पुरुषांचची जयंती साजरी करून भागणार नाही तर त्यांचे विचार आपल्या जीवनात रुजविण्याची खरी गरज आहे. आईचे संस्कार कसे असावेत हे राजमाता जिजाऊ यांचेकडून शिकावे.तर आदर्श जीवनासाठी स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचावे.”असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त करुन विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद व जिजाऊंच्या चरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रा. घारे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी मंडळाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब तेलोरे यांनी तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रेखा कढणे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. वाल्मिक गिते, प्रा. डॉ. लहू काकडे, प्रा. संतोष अस्वले, प्रा. लक्ष्मण वाळे, प्रा. सतीश शिंदे, प्रा. सयाजी हांडे, प्रा. नितीन लहामगे, प्रा. गणेश कुसमुडे, प्रा. गवळी जे.बी., प्रा. परते एस.एस., उत्तम पवार, सूरज साबळे, शाम पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थी या कार्यक्रमास हजर होते.