कळसुबाई शिखरा वरील मंदिर देवस्थान विकासासाठी 91 वर्षाच्या हौसाबाईंचे उपोषण सुरू!

अकोले प्रतिनिधी
राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून नोंद असणारे कळसुबाई शिखर आहे अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगात असणाऱ्या या शिखरावर कळसूमाता हे देवस्थान जागृत देवस्थान आहे मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे हे देवस्थान अविकसित राहिले आहे
या देवस्थानचा शासनाने जीर्णोद्धार करून विकास करावा या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९१ वर्षाच्या हौसाबाईंनी अकोले तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारी उपोषण सुरू केले आहे
कळसुबाई शिखर देवस्थान मंदिर व परिसराचा विकास व्हावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अकोले तहसील कार्यालयासमोर ९१ वर्षाच्या ह भ प श्रीमती हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी यांनी आमरण उपोषण सुरु आहे.

अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर पर्यटक व गिर्यारोहकांचे पर्यटन यांचे आकर्षणाचे ठिकाण आहे
कळसुबाई शिखरावर कळसुमाता देवीचं मंदिर आहे.
या पुरातन मंदिराकडे शासनाच्या पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.देवीचं मंदिर पुरातन असल्याने जीर्ण होऊन पडझड झाली आहे.याच मंदिरामुळे कळसुबाईच्या शिखराचे नाव राज्यात लोकप्रिय आहे. परंतु मंदिराची अवस्था अधिक बिकट झाली आहे.कळसुबाई शिखरावर नवरात्रीत उत्सव साजरा केला जातो. परंतु भाविकांना व पर्यटकांना अद्याप सोयीनसुविधा उपलब्ध नाही

. देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन पेक्षा अधिक व्यक्ति बसु शकत नाही.मंदिर जिर्णोद्धाराची गरज आहे धार्मिक रूढी परंपरेनुसार उत्सव, सप्ताह, यात्रा निमीत्ताने लाखो भाविक नवरात्र उत्सवास येतात. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे मात्र सोयी सुविधा नसल्याने भाविकांची गैरसोई व कुचंबना होत आहे.
मी स्वतः यापुर्वी दोन वेळा गडावर भाविकांसोबत ताडपत्रीचे शेड उभारून सप्ताह केलेले आहेत. तेथे निवारा नसल्याने आमची देखील खुपच कुचंबना झाली होती.
कळसुबाई शिखराचे महत्व लक्षात घेता, कळसुबाई शिखर देवस्थान, मंदिराचा दुर्लक्षित विकास, भाविक व पर्यटकांची निवारा गैरसोय लक्षात आणून देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी शांतता व सनदशिर मार्गाचा अवलंब स्विकारून शुक्रवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असल्याचे ह. भ. प. श्रीमती हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी यांनी सांगितले