कळस बु! (मांडवदरा )येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन संपन्न…..

अनेक वर्षांची पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपणार ...
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस बु! (मांडव दारा) येथे 200 ते 250 लोकवस्ती आहे गेली अनेक वर्षांपासून या वस्तीसाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती.कळस गावापासून मांडव दारा वस्ती लांब असल्याने मधे उंच डोंगर असल्याने या वस्तीला स्वतंत्र सार्वजनिक पाणी पुरवठा करणे अवघड होते मात्र पंचायत समिती सदस्य श्री गोरख किसन पथवे यांच्या पंचायत समिती 15 सेसनिधी मधून या मांडव दारा वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकी साठी दीड लक्ष (1.50 ) रुपये ची तरतूद केली असून आज या कामाचे उद्घाटन संपन्न झाले
कळस बू! मधील मांडव दारा येथे मोठी आदिवासी समाजाची वस्ती आहे कळस शिवारात उंच डोंगराच्या पलिकडे सावरचोळ शिवार लगत ही लोकं वस्ती आहे गावापासून लांब तसेच मधे उंच डोंगर असल्याने या वस्तीसाठी आज वर कोणत्याही प्रकारची सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सोय झालेली नव्हती येथिल नागरिकांना रोज शेजारील विहीर , बारवे या सारख्या खासगी स्रोत असलेल्या ठिकाणी जवा लागत होते अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना हक्काचे पिण्याच्या पाण्याचे साधन नव्हते रोज पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागत होती मात्र आज येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम मंजूर झाल्याने अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून आज कामाचे उद्धाटन झाले
या प्रसंगी माजी उपसभापती मारुती मेंगाळ पंचायत समिती सदस्य गोरख पथवे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश पथवे, अण्णासाहेब ढगे,नानासाहेब वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, गोपीनाथ ढगे, बाजीराव ढगे, गुलाब तेलंम ,राजू सावंत , प्रकाश वाजे, पोपट मेंगाळ, नवनाथ मेंगाळ, मारुती सोमा मेंगाळ, भरत गिऱ्हे, भाऊराव मेंगाळ, विजय मेंगाळ, काळू मेंगाळ, या सहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते———