इतर
नाभिक एकता महासंघाच्या जिल्हा प्रवक्तेपदी .श्री किरण मदने, यांची निवड …!

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
कोपरगाव येथे समाज पदाधिकारी मिटिंगमध्ये राष्ट्रीय नाभिक महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण बिडवे व नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष .श्री मनोज वाघ यांच्या उपस्थितीत संगमनेर येथील श्री किरण मदने यांची अहमदनगर जिल्हा प्रवक्तेपदी एकमताने निवड करण्यात आली.
श्री किरण मदने हे समाजातील विविध विषयावर अभ्यास करून तो विषय प्रसार माध्यमातून योग्य प्रकारे लेखन करुन समाज बांधवांना जागृत करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष श्री भाऊसाहेब बिडवे, कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री दिलीपशेठ जाधव, संगमनेर तालुका अध्यक्ष श्री किशोर बिडवे सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री अनिल बिडे, संगमनेर तालुका सलून असोसिएशन तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब वाघ श्री सुनिल गायकवाड, श्री आनंद बिडवे, श्री संजय सोनवणे, श्री संजय राऊत, कोपरगाव शहर उपाध्यक्ष श्री सोमनाथ व्यवहारे, श्री श्यामकाका आहेर, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष श्री दत्तात्रय आहेर, राहता सलून असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संदीप अहिरे, सलून असोसिएशन कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री मनोज बिडवे, श्री दिनेश संत, अकोला तालुका कार्याध्यक्ष श्री अमोल कोल्हाळ, श्री गणेश बिडवे श्री रवींद्र भराडे आदी समाज बांधव समाज उपस्थित होते.