शेवगाव- पाथर्डीच्या विकास कामात पत्रकाराचे मोलाचे योगदान -आमदार मोनिका राजळे

शहारामआगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मतदार संघाच्या विकास कामात शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांचे मोलाचे योगदान आहे. सकारात्मक पत्रकारीता नेहमीच विकासाला पुरक ठरते. पत्रकारांनी मांडलेल्या समस्यांवर काम करणे अधिक सोपे जाते. भविष्यातही सर्व सामान्य नागरीकांना अभिप्रेत असलेलले विकासकामे व तळागाळातील समस्या याबाबत पत्रकारांनी दक्ष राहून वाचा फोडावी. असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
आमदार मोनिका राजळे यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शेवगाव प पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांचा शेवगाव येथील कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी राजळे बोलत होत्या.
कार्यक्रमास जिल्हा परीषद सदस्य राहूल राजळे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य बापुसाहेब पाटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष तारांचद लोढे, नगरसेवक महेश फलके, शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष कैलास बुधवंत, पाथर्डी प्रेस क्लबचे तालुकाध्यक्ष उमेश मोरगावकर आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या की, पत्रकार जागरुक असले की राजकारणी व लोकप्रतिनिधींना अधिक जागरुक रहावे लागते. पत्रकाराने वैयक्तिक हेवदावे, मतमतांतरे बाजूला ठेवून निरपेक्ष व तटस्थ भुमिका ठेवून लिखान केले पाहीजे. दोन्ही तालुक्यातील पत्रकरांनी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांच्यापासून स्व.राजीव राजळे व आमच्या कुटूंबाला सहकार्य केले. हीच सहकार्याची भावना या पुढील काळातही राहू दयावी.
याप्रसंगी रमेश चौधरी, निलकंठ कराड, अविनाश देशमुख,सचिन सातपुते, अविनाश मंत्री, राजेंद्र सावंत, बाबासाहेब गर्जे, नारायण पालवे, राजू घुगरे, अमोल कांकरीया, दादासाहेब खेडकर, बाळासाहेब खेडकर, संदीप देहाडराय, इलेक्ट्राँनिक मिडीयाचे अध्यक्ष अलीम शेख, दिपक खोसे, महादेव दळे, अनिल कांबळे, लक्ष्मण मडके, जयप्रकाश बागडे ,गणेश देशपांडे, विजयकुमार लड्डा, अनिल खैरे, रणजीत घुगे, कुंडलीक घुगे, उध्दव देशमुख, इसाक शेख, राजेंद्र पानकर, पांडुरंग निंबाळकर ,अनिल खैरे, सुरेश विधाते, बाळासाहेब जाधव,रेवणनाथ नजन, दादासाहेब डोंगरे, शहाराम आगळे, रविंद्र मडके, सुनिल पाहिलवान, रावसाहेब मडके,यांच्यासह शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी विविध पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांसह सर्व पत्रकारांचा राजळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक जे.बी.वांढेकर यांनी तर सुत्रसंचालन सुरेश बाबर यांनी केले. तर नगरसेवक महेश फलके यांनी आभार मानले.
– शेवगाव – पाथर्डीच्या पत्रकारांचा सन्मान
शेवगाव तालुक्यात यापुर्वी साजऱ्या करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये काही राजकियपक्षाच्या नेत्याच्या बगलबच्या कडून ग्रामीण आणि शहरी पत्रकार असा भेद निर्माण करण्याचा कुटिल डाव रचला गेला आहे. या बुध्दी भ्रष्टांना नुकत्याच झालेल्या पत्रकार सन्मान सोहळयानी चांगली चपराक बसली, असल्याची भावना ग्रामीण पत्रकारांमध्ये चर्चेली जात आहे. समाजहिताचे प्रश्न आपल्या लेखणीतुन माडणारा पत्रकर हा एकच घटक आहे. त्यात स्वतःच्या राजकिय आस्तित्वासाठी शहरी आणि ग्रामीण असा भेद करणं अपनास्पद आहे.पत्रकार हा समाजहिताचे प्रश्न माडंताना भेदभाव करत नाही. मात्र तालुक्यातील पत्रकारांत असा भेद करणं योग्य नाही.राजळे कुटुंबायांनी आज पर्यत दोन्ही तालुक्यातील सर्वच पत्रकाराचा सन्मानच केलेला आहे. या सन्मान सोहळ्यामध्येहि कोणताही भेदभाव केला नाही.शहाराम आगळे
ग्रामीण पत्रकार शेवगाव