शहर टाकळी कडे जाणारी गाडी रेडी नदीत वाहून गेली! तिघांचे प्राण वाचवण्यात यश

आठावडा भरात याच ठिकाणी दुसरी घटना
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव येथून शहरटाकळी कडे जाणाऱ्या माल वाहतूक करणारी टाटा एसी गाडीच्या बस चालकाला रेडी नदी वरून वाहत असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने, माल वाहू गाडी पाण्यात वाहून गेली.
ही घटना मंगळवार ता. १८ दुपारी तीन वाजता देवटाकळी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेडी नदीवर घडली.या मध्ये गाडीचा चालक व इतर ३ जण गाडीबरोबर पाण्यात वाहून गेले.मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सर्वांना वाचविण्यात यश त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.
शेवगाव वरून शहरटाकळी कडे जाणारी टाटा एसी दुपारी तीन वाजता शेवगाव वरून घराकडे निघाली.गाडीचा ड्रायव्हर संतोष श्रीधर काटे,त्याच बरोबर शहरटाकळी येथील वसंत नागोजी पंडित,विठ्ठल कडूबाळ घुले,व देवटाकळी येथील एक जण (नाव समजले नाही) दरवाजा उघडून बाहेर उडी टाकली.गावकऱ्यांनी त्यांना पुरातून बाहेर काढले त्यामुळे ते सर्वजण बचावले.
यावेळी शहरटाकळी येथील सुनील रामभाऊ गवळी, गणेश अंबादास गवळी, भावीनिमगाव येथील देविदास देशमुख, सचिन कुंडली काळे व देवटाकळी येथील अशोक दळे यांनी शर्तीचे प्रयत्न करून सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
मागील आठवड्यात शहरटाकळी येथील याच नदीवर दोन शाळेतील युवक पाण्यात वाहून गेले होते.मात्र ग्रामस्थांनी दोरीच्या साह्यांना त्यांनाही वाचवण्यात यश मिळवले होते. त्यानंतर आता आठवडेभरात ही दुसरी घटना आहे.
शेवगाव दहिगावने या रस्त्यावरील देवटाकळी येथील रेडी नदीवरील पुलाची उंची खूपच कमी असल्यामुळे पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीसाठी पूल बंद होतो. दहिगाव शेवगाव कडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. थोडाही पाऊस पडल्यानंतर फुल वाहतुकीसाठी बंद होतो त्यामुळे फुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.