आम्ही नगरकर मुंबई संघ च्या संमेलनाला मुंबईत नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत आम्ही नगरकर एकवटले
मुंबई प्रतिनिधी
आम्ही नगरकर मुंबई संघ वतीने आयोजित मुंबई ,ठाणे ,नवी मुंबई शहरातील नगरकर बांधवांना एकत्रित करीत नगरकरांचे संमेलन नेरळ नवी मुंबई येथे पार पडले या संमेलनात नगरकर एकवटल्याचे दिसून आले
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ समावेश करीतनोकरी ,व्यवसाय, वधू वर ,विविध क्षेत्रातील नगरकर बांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नगरकर मुंबई संघ नेरूळ नवी मुंबई येथे स्नेहसंमेलन आयोजित केले होते या कार्यक्रमामध्ये सर्व सीमा सोडून नगरकर बांधव एकत्र आले होते या कार्यक्रमामध्ये नगरकर बांधवांची एकजूट दिसून आली त्याचप्रमाणे भविष्यामध्ये नगरकर बांधवांना कशा पद्धतीने सहकार्य करण्यात येईल ,मदत करण्यात येईल याची माहिती देण्यात आली तसेच भविष्यात ठिकठिकाणी नगरकर बांधवांचे स्नेहसंमेलन आयोजित करत संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असा संकल्प करण्यात आला

यावेळी आम्ही नगरकर संघ संकल्पक मंगेश शेळके पाटील , कोर कमिटी बजरंग तांगडकर, किरण बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले आम्ही नगरकर मुंबई संघ का? व कशासाठी ?याबाबत त्यांनी समाज बांधवांना याबाबत मार्गदर्शन करत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य ,राजकीय तसेच नोकरी व्यवसाय वधु वर परिचय साठी एक व्यासपीठ असेल जे फक्त नगरकर बांधवांसाठीच कार्यरत असेल यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत सर्वांना एका व्यासपीठावर आणत मुंबई ठाणे नवी मुंबई शहरातील नगरकरांना आधार देण्याचा हा प्रयत्न ज्याला नेरूळ नवी मुंबई येथील कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीने उद्देश यशस्वीरीत्या पुढे नेण्यास बळ मिळाले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नवी मुंबई माजी महापौर श्री सुधाकर सोनवणे,उद्योजक श्री नितिन गोडसे,
ठाणे माजी नगरसेविका सौ.आशाताई डोंगरे,मुख्यमंत्री कार्यालय स्वीय सहायक श्री श्रीकांत तोडकर, येशोमंदिर पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.संकेत हुलवळे, माळशेज पतसंस्थेचे अध्यक्ष ह भ प चंद्रकांत डुंबरे, ब्राम्हणवाडा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड श्री अशोक गायकर,श्री शाम शेंडकर उद्योजक श्री नानासाहेब शेंडकर यांचे सुपुत्र, आम्ही नगरकर संघ चे श्री तानाजी करपे,सौ.हिरताई आवारी,श्री.रमेश खैरे उपस्थित होते

यावेळी आम्ही नगरकर मुंबई संघ मुंबई ,ठाणे ,नवी मुंबई मध्ये संघटन वाढीसाठी पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली प्रशांत आहेर (सोशल मिडिया प्रमुख),रंजना माने (महिला सोशल मिडिया प्रमुख),सारिका झावरे(कल्याण महिला संपर्क प्रमुख),किरण बोडके (नवी मुंबई संपर्क प्रमुख) मनीषा गोडसे ( ऐरोली संपर्क प्रमुख ),
बाळासाहेब हांडे (कल्याण संपर्क प्रमुख),वसंत कासार (टिटवाळा संपर्क प्रमुख),किरण हांडे (आंबिवली संपर्क प्रमुख),मनिषा खैरे (घाटकोपर संपर्क प्रमुख),उषाताई बोरूडे,(ठाणे संपर्क प्रमुख),प्रकाश डावरे सर, महेश मोरे (अंबरनाथ संपर्क प्रमुख), प्रवीण पवार (कामोठे पनवेल संपर्क प्रमुख) यांना जबाबदारी देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अडमिन टिम
प्रशांत आहेर,किरण बोडके,बाळासाहेब हांडे,रंजना माने,मालुंजकर रमेश,मंगेश काळे,सागर शिंदे,अविनाश नरवडे,प्रवीण फापाळे,प्रवीण पवार,,रामनाथ भोजने,समीर अभाळे, वर्षा सोनवणे,रविकिरण भोसले,वसंत कासार,मधुकर मते,रुकेश शेळके,रामदास बोऱ्हाडे, सागर शिंदे,मनीषा खैरे,उषा बोरुडे यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन श्री रामदास भोजने यांनी केले
तर बाबासाहेब गुंजाळ सर यांनी आभार मानले
