रोटरी क्लब ऑफ नासिक चे वतीने प्रौढ साक्षरता साधन सामुग्री संचाचे वाटप !

नाशिक दि 16 रोटरी इंटेरनॅशनलच्या प्रौढ साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लब ऑफ नासिक ने आनंदवल्ली येथील ज़िल्हा परिषद शाळेमध्ये तसेच काठेगल्ली मधील अटल बिहारी बाजपेयी शाळे मध्ये प्रौढ साक्षरते साठी विशेष प्रयत्न करीत दोन अनोख्या कार्यक्रम द्वारे १७० लाभार्थीना प्रौढ साक्षरता साधन सामुग्री संचाचे ( Adult Literacy Kits ) वाटप केले .
या संचा मध्ये अक्षर ओळख , अंक ओळख , लेखन पुस्तिका , फळ व फुलांची चित्र , बाराखडी , घरी सराव करण्या साठी दोनशे पानी वही , आणि लेखन साहित्याचा समावेश आहे. आनंदवल्ली ज़िल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.ठाकरे सर तसेच काठेगल्ली येथील अटल बिहारी बाजपेयी शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर या दोघांनीहि रोटरी क्लब ऑफ नासिक च्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व या प्रौढ साक्षरता अभियान कार्याचे कौतुक केले.
अश्या प्रकारच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा नक्कीच साक्षर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच या प्रौढ साक्षरता साधन सामुग्री संचाचा उपयोग करून त्याचा कसा लाभ होत आहे याबद्दल वेळोवेळी रोटरी क्लब ऑफ नासिकला माहिती देऊ अशी ग्वाही हि त्यांनी दिली.या दोन्हींनी मुख्याध्यापकांनी आवर्जून उल्लेख केला कि हे किट्स चा उपयोग पालकांना आणि विद्यार्थ्यांना होईल. आनंदवल्ली येथील शाळेतील मुख्याध्यापकांनी रोटरी क्लब ने त्याच्या शाळे मध्ये छोटे ग्रंथालय सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावी अशी विनंती केली. काठेगल्ली मधील शाळेतील मुख्याध्यापकांनी सुद्धा शाळेचा सर्वागीण विकास होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नासिक ने मदत करावी अशी विनंती केली. याच कार्यक्रम मध्ये शंभर विद्यार्थ्यांना आपले हात स्वछ कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.या कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी टीच डिरेक्टर उर्मी दिनानि, लिटरसि चेयर सुचेता महादेवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. रोटरी क्लब ऑफ नासिक च्या अध्यक्षा रोटे डॉ श्रीया कुलकर्णी , दिलीपसिंग बेनीवाल , वैशाली जोशी , निलेश सोनजे ,मंगेश अपशंकर ,विनायक व उर्मिला देवधर हे सर्व रोटेरिअन्स दोनीही कार्यक्रमास उपस्थित होते.