कळसूबाई शिखरावर सुविधा देण्याचे आश्वासन, ९१ वर्षाच्या हौसाबाईंचे उपोषण मागे !

कळसूबाई शिखरावर सुविधा देण्याच्या आश्वासनानंतर ९१ वर्षाच्या हौसाबाईंचे उपोषण मागे
अकोले /प्रतिनिधी
राज्यात सर्वात उंच असणाऱ्या-कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच कळसुबाई शिखरावर येणाऱ्यां भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी 91 वर्षाच्या हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले या वृद्ध महिलेने अकोले तहसील कार्यालयासमोरतीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाला अनेक संघटनांचाही पाठिंबा दिला होता तिसऱ्या दिवशी वनखात्याच्या लेखी पत्र नुसार व आमदार. डॉ. किरण लहामटे यांनी निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर रविवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
९१ वर्षांच्या हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसूबाई शिखरावरीलमंदिराचा जीर्णोद्धार करून पर्यटक व भाविकांना सोयी सुविधा देण्या साठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.पहिले दोन दिवसवनविभागाच्या अधिकाऱ्यांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले. काल रविवारी उपोषणाचा तिसरा दिवसअसल्याने उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध हौसाबाई नाईकवाडी यांची आ.किरण लहामटे,अकोले वनपरिक्षेत्र अधिकारीप्रदीप. कदम, तहसीलदार सतीश थेटे,राजूर वन परिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्यांसंदर्भातचर्चा केली., कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोध्दार करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असून भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.आमदर डॉ. किरण लहामटे यांनी यावेळी दिले ठोस आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले नंतरत्यांना आमदार ल हा मटे यांनी नारळ पाणी दिल्याने अखेर काल तिसऱ्या दिवशी त्यांनी आपले उपोषन मागे घेतले .तर तहसीलदार सतीश थेटे यांनी श्रीमतीनाईकवाडी यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देऊनआपल्या उपोषणातील मागणी वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त असल्याने आम्ही संबंधित कार्यालयाशी संर्पकात राहून नियमानुसार योग्य ती कार्यालयीन
कार्यवाही करण्यांची दक्षता घेत आहोतअसे सांगितले यावेळी तुकाराम महाराज जाधव, राम तळेकर, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी:काकड, प्रा. बादशहा ताजणे, शांताराम महाराज पापळ, बाळासाहेब भांगरेआदी उपस्थित होते.