आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२०/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २८ शके १९४६
दिनांक :- २०/१०/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०२,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०६:४७, चतुर्थी २८;१८,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति ०८:३२,
योग :- व्यतीपात समाप्ति १४:११,
करण :- बव समाप्ति १७:२७,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:३५ ते ०६:०२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:४२ ते ०३:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी (मुंबई चं.उ. २०:३४), करक चतुर्थी, घबाड ०८:३२ नं. २८:१८ प., भद्रा ०६:४७ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन २८ शके १९४६
दिनांक = २०/१०/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
मनात ठरवलेल्या गोष्टी तशास घडतील. कोणाला शब्द देताना विचार करावा. आवश्यक कामे यथायोग्य पार पडतील. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवावे. परिचितांना मदत कराल.
वृषभ
धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. भागीदारीत तुमचे वर्चस्व राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. नवीन लोक संपर्कात येतील.
मिथुन
ठरवलेल्या गोष्टीत सारखे बदल करू नका. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. बुद्धी चातुर्याचा वापर कराल. भावंडांचे सहकार्य मिळेल.
कर्क
व्यावसायिक ठिकाणी काही बदल घडून येतील. विलंबित गोष्टी मार्गी लागतील. दिवस माध्यम फलदायी असेल. जमाखर्चाचा ताळमेळ ठेवावा. भावनांना आवर घालावा.
सिंह
आपली मनोकामना पूर्ण होईल. जुनी उधारी वसूल होईल. घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा.
कन्या
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. घरासाठी मोठी खरेदी कराल. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील. बचतीच्या योजना आखाव्यात. अधिकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल.
तूळ
महत्त्वाच्या निर्णयावर तोडगा निघेल. कौटुंबिक खर्च वाढेल. आपल्या निर्णयावर ठाम राहा. समोरील गोष्टीत आनंद माना. मुलांची प्रगती दिसून येईल.
वृश्चिक
वादाचा मुद्दा पटवून देऊ नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. व्यवसायात चांगल्या संधि प्राप्त होतील. नवीन कार्यारंभास अनुकूल काळ. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
धनू
मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या.
मकर
विचारांना योग्य गती द्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना डोके शांत ठेवा. वडीलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. महत्त्वाच्या निर्णयापूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्यावा. सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल.
कुंभ
बोलताना भान हरवू नका. हितचिंतकांचा सल्ला मोलाचा ठरेल. सढळ हाताने मदत करा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी.
मीन
प्रतिस्पर्ध्याशी सावधानतेने वागा. आततायीपणे निर्णय घेऊ नका. अधिकारी व्यक्तीचा सल्ला विचारात घ्या. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांशी नाते दृढ होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर