राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि २१/०१/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁 आजचे पंचांग 🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०१ शके १९४३
दिनांक :- २१/०१/२०२२,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१६,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०८:५२,
नक्षत्र :- मघा समाप्ति ०९:४३,
योग :- सौभाग्य समाप्ति १५:०४,
करण :- बव समाप्ति २१:०७,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उत्तराषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:१७ ते १२:४१ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२९ ते ०९:५३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:५३ ते ११:१७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:४१ ते ०२:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
संकष्ट चतुर्थी(मुंबई चं.उ. २१:२५), भा. माघ मासारंभ, घबाड ०९:४३ नं., भद्रा ०८:५२ प.,
———-

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ०१ शके १९४३
दिनांक = २१/०१/२०२२
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
घरातील वातावरण चांगले राहील. मुलांसोबत मजेत वेळ घालवाल. काही धार्मिक विधींनी मनाला शांती मिळेल. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. मनातील इच्छा बोलून दाखवाल.

वृषभ
आपल्याला हवी असणारी उत्तरे मिळतील. नवीन योजनांसाठी अधिक वेळ द्यावा लागेल. पुढील गोष्टींचे नियोजन करावे लागेल. मानसिक शांतता लाभेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

मिथुन
जुनी उधारी वसूल होईल. घरातील वातावरण चांगले राहील. जवळच्या ठिकाणी प्रवास घडेल. भावंडांची चांगली मदत होईल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

कर्क
मानसिक चंचलता जाणवेल. नवीन कामासाठी चांगला वेळ. हातातील काम फलदायी असेल. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. व्यापारी वर्गाला चांगला दिवस.

सिंह
व्यावसायिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवा. दिवस आपल्या मनासारखा घालवाल. कार्यक्षेत्रात वाढीव मेहनत घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल.

कन्या
मित्रांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. घरात धार्मिक वातावरण राहील. बोलताना तारतम्य बाळगा. संयमाने परिस्थिती हाताळावी. कौटुंबिक खर्चाला आळा घालावा.

तूळ
आपल्याच धुंदीत दिवस घालवाल. स्वत:चेच म्हणणे खरे कराल. मनातील इच्छेला अधिक महत्त्व द्याल. नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. व्यावसायिकांना चांगला लाभ होईल.

वृश्चिक
अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणुकीला चांगला काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. कामातील समस्या दूर होतील. नवीन ओळख होईल.

धनू
नातेवाईकांच्या होकारात होकार मिसळू नका. स्वत: तारतम्य बाळगून विचार करावा. कामाच्या ठिकाणी फक्त आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. राजकारणापासून दूर राहावे. मित्रांसाठी मदतीचा हात पुढे कराल.

मकर
काम आणि वेळ यांचा समन्वय साधावा. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालू नका. नियमांचे काटेकोर पालन करा. अति विचार करत बसू नका. भावंडांची बाजू समजून घ्यावी.

कुंभ
कामाच्या बदललेल्या स्वरूपाशी जुळवून घ्या. समोरच्या व्यक्तीचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. भागीदारीच्या व्यवसायात काटेकोर राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल.

मीन
अंग मेहनतीला मागे हटु नका. मित्रांची बरेच दिवसांनी गाठ पडेल. नवीन संपर्कातून काही गोष्टी समोर येतील. नोकरदारांना दिवस समाधानकारक जाईल. संयमाने कामे करावीत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button