जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ संजय घोगरे यांची नियुक्ती!

अकोले प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ.संजय घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सुमारे पंचवीस वर्षाचा दीर्घ सेवा झालेले संजय घोगरे हे अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवारत आहेत त्यांनी संगमनेर -अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात अतिशय उत्कृष्ट काम केले अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांची अधिक सेवा झाली
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काही दिवसापूर्वी झालेल्या जाळीत कांडा नंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरण हे सक्तीच्या रजेवर आहेत तेव्हापासून या पदावर डॉ भूषण रामटेके यांच्या कडे या पदाची जबाबदरी आहे मात्र डॉ रामटेके यांची औरंगाबाद ला बदली झाल्याने आता जिल्हा शल्य चिकित्सक पदावर डॉ संजय घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
जिल्हा शल्य चिकित्सक पदावर नेमणूक झाल्याची बातमी अकोल्यात समजताच अकोले ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर संजय घोगरे यांची अनेकांनी भेट घेत अभिनंदन केले व त्यांचा सत्कार केला
