श्रमजीवी पेन्शन धारकांना किमान 5 हजार रुपये पेन्शन करा!

अर्थ संकल्पात भरीव तरतूद न केल्यास संसदेला घेराव घालण्याचा भारतीय मजदूर संघाचा इशारा
पुणे दि 21
श्रमजीवी पेन्शन धारकांना किमान 5 हजार रुपये पेन्शन करा
अशी मागणी करत पेंशन मागणी चा अर्थ संकल्पात भरीव तरतूद न केल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाने दिला आहे

ई पी एस पेंशन धारकांना सध्या वयाच्या 58 वर्ष पुर्ण केलेल्या पेंशन धारकांना किमान पेंशन रू 1000 मिळत असुन बिडी ऊद्योगातील कामगारांना कमी दराने रू 600 ते 1000 रू प्रमाणे पेंशन मिळत असल्याने पेंशन धारकांना किमान अत्यावश्यक गरजा भागवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. वाढत्या वया मुळे आजारपणाचे खर्ज करू न शकल्याने लाखो पेंशन धारकांना हालाखीचे जिवन जगावे लागत आहे. म्हणून भारतीय मजदूर संघाच्या वतीने पेंशन संदर्भात भविष्य निर्वाह निधी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
सन 1995 नंतर पेंशन मध्ये वाढ करण्यात आली नव्हती म्हणून भारतीय मजदूर संघाच्या पाठपुरावा मुळे सन 2010 साली मा. भगतसिंग कोशीयारी समिती स्थापन करण्यात आली या वेळी रू 1000 प्रतिमाहे पेंशन लागु करण्यात आली व याची अंमलबजावणी भारत सरकारने 2014 साली केली. मात्र गेल्या 11 वर्षात वाढलेल्या महागाई, वाढलेल्या किमान गरजेचांचे दर, औषध उपचार चा खर्च विचारात घेवून भविप्य निर्वाह निधी संघटनेने पेंशन रक्कम वाढविणे आवश्यक होते. परंतु सद्य परिस्थितीत मा केरळ उच्च न्यायालयाने पेशन्स वाढी संदर्भात निर्णय देवूनही मा. सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका प्रलंबित आहेत.
ईम्माईज डिपाॅझीट लिंक ईन्शुरन्स स्किम नुसार सदस्य चा मृत्यू झाल्यास 7 लाख रू पर्यंत ची तरतूद केली आहे. परंतु कामगारांच्या जीवनात दवाखान्याचे वाढते दर विचारात घेता तुटपुंज्या उत्पनातुन औषध उपचार खर्च करणं शक्य होत नाही. तरी पी एफ सदस्याला नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळवी अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.
अशा परिस्थितीत भारत
सरकारने हस्तक्षेप करून कामगारांना न्याय देण्यासाठी विविध आंदोलने केली , निवेदनं दिली आहेत तरी सुध्दा भारत सरकार अल्प उत्पन, कष्टकरी समाजाची दखल घेतली नाही म्हणून भारतीय मजदूर संघाचे वतीने दि 20 जानेवारी 2022 रोजी आकुर्डी व पुणे क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय व देशभरातील भविष्य निर्वाह कार्यालया समोर निर्दशने करण्यात आली.
यावेळी
प्रमुख मागण्या-
1) किमान पेंशन प्रतिमाहे रू 5000 करावी
2) पीफ व पेंशन धारकांना नि:शुल्क आरोग्य सेवा देण्यात यावी
3) शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम पेंशन म्हणून देण्यात यावी
4) शासनाने घोषित केलेला महागाई भत्ता पेंशन धारकांना मिळावा.ई मागण्या केल्या आहेत

यावेळी आकुर्डी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आयुक्त मा सचिन बोराटे यांनी निवेदन स्विकारले. भारतीय मजदूर संघाच्या शिप्ट मंडळामध्ये अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, पुणे विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण, प्रदेश सचिव सुधाकर पाटील भोसरी विभागातून अण्णा महाजन उपस्थित होते.
या वेळी भोसरी विभागातून सेंचुरी ऐन्का कामगार कमिटी ,महेंद्रा सी, आय ,ई , ऐ स ऐ ल चाकण, सुर्या ईंजिनीयरींग भोसरी , डाटसन्न, आॅडनस्स फॅटरी देहुरोड , या कंपनी मधील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते
या बाबतीचे निवेदन मा केंद्रीय अर्थमंत्री व मा केंद्रीय श्रममंत्री यांना देण्यासाठी भविष्य निर्वाह क्षेत्रीय आयुक्त पुणे गोळीबार मैदान येथे क्षेत्रीय आयुक्त निखील चंद्रा झोडे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी भारतीय मजदूर संघाच्या शिप्ट मंडळामध्ये अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे सरचिटणीस उमेश विस्वाद, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, विभाग प्रमुख अर्जुन चव्हाण, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कार्याध्यक्ष उमेश आणेराव, वासंती तुम्मा, विजया लक्ष्मी यमुल उपस्थित होते.
या वेळी भारतीय मजदूर संघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी श्री अभय वर्तक, विवेक ठकार, प्रविण पवार, यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनात विज उद्योगातील कंत्राटी कामगार, बॅंक, औद्योगिक , संरक्षण, रेल्वे् टेलीफोन, मधील कंत्राटी कामगार, सरकारी कामगार पदाधिकारी, बिडी कामगार, परिवहन, हाॅटेल शिक्षक उत्तर कामगार उपस्थित होते.
पेंशन मागणी चा अर्थ संल्कपात भरीव तरतूद न केल्यास संसदेला घेराव घालण्याचा इशारा भारतीय मजदूर संघाने दिला आहे
