
बाळासाहेब देशमुख यांची अध्यक्षपदी निवड!
अकोले प्रतिनिधी
संगमनेर अकोले तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय बैठक ल हित बुद्रुक (तालुका अकोले) येथे संपन्न झाली या बैठकीस संगमनेर अकोले तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते
यावेळी अकोले संगमनेर तालुका पोल्ट्री व्यवसायिकांची संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेच्या अध्यक्षपदी कोतुळ येथील बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली यावेळी असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेब देशमुख ,उपाध्यक्षपदी राहुल दौलत नवले सेक्रेटरी म्हणून जितेश नंदु साबळे यांची सर खजिनदारपदी- दिपक मधुकर शेवंते
सल्लागारपदी- मच्छिंद्र चंद्रकांत भागवत ,विनायक बबन सुपेकर ,बाळासाहेब भिमाजी कानवडे ,यांची निवड करण्यात आली कार्यकारणी मध्ये रामनाथ चौधरी ,जालिंदर बोडके सखाराम घोडे, राजू भोर,शिवाजी गवारी ,भाऊसाहेब साबळे ,संजय शेळके, एकनाथ रंधे, संजय चौधरी ,सोमनाथ धनवट ,सदाशिव शेळके, हुसेन सय्यद यांची निवड करण्यात आली यावेळी बाळासाहेब कानवडे मच्छीन्द्र भागवत बाळासाहेब वाडेकर विनायक सुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले
या अकोले संगमनेर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते
गेल्या अनेक वर्षेपासून वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती, वादळ ,महापूर, बर्ड फ्लू त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे पोट्री धारक शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. मात्र पोट्री व्यवस्थापन करण्यासाठी होणारा खर्च वाढत चालला आहे. गरीब शेतकऱ्याकडून स्वताचे भांडवल नाही .म्हणून कंपनीवर अवलंबून राहावे लागत आहे.कंपनी कडून मिळणाऱ्या
मोबादल्यामधून शेतकऱ्याला विजेचे बिले, कामाचा खर्च, बँकेचे कर्ज, पोट्री व्यवस्थापनाचा खर्च कसा भागावा हा प्रश्न आता पोल्ट्री धारकांसाठी महत्वाचा बनला असल्याने संघटनेच्या माध्यमातून पोल्ट्री व्यावसायिकांचे अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी संगमनेर अकोले तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी संघटना स्थापन केल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले
