जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धचा निकाल जाहिर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शेवगाव तालुका शाखेने पत्रलेखन विद्यार्थ्यांमधील पत्रलेखन कला विकसित व्हावी, या हेतूने आयोजित केलेल्या ‘जिल्हास्तरीय पत्रलेखन स्पर्धेचा’ निकाल जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत कांबळे श्रुष्टी देवदान (दहिगाव ने) हिने प्रथम, ओंकार राजेंद्र उदारे (पाथर्डी) याने द्वितीय तर प्रेरणा बैरागी( शेवगाव) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला, असल्याची माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शेवगाव शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र नजन, उपाध्यक्ष विजय हुसळे, कार्याध्यक्ष शहाराम आगळे व सचिव सुरेश शेरे यांनी दिली.
कार्तिकी भुसारे, साक्षी काथवटे, महेश शिंदे, रोहन काळे, शुभम वावरे यांना उत्तेजनार्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि.२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता महात्मा सार्वजनिक वाचनालय, शेवगाव येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार असून विजेत्यांनी स्पर्धा कांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख उमेश घेवरीकर यांनी केले आहे. सहभागी सर्वच स्पर्धाकांचे
साहित्य परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र उदागे उपाध्यक्ष सुभाष सोनवणे शब्दगंधचे सचिव सुनिल गोसावी शर्मिलाताई गोसावी यांनी अभिंनदन केले आहे.