दिनकर रायकर यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले
रायकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून पत्रकारितेची सुरुवात केली. मुंबईत राहायला घर नसल्याने ते इंडियन एक्स्प्रेसच्या
ऑफिसमध्ये राहायचे आणि तिथे काम करायचे. एक्सप्रेस ग्रुपमध्ये डीटीपी ऑपरेटर, रिपोर्टर ते डेप्युटी एडिटर असा यशस्वी प्रवास त्यांनी केला. लोकसत्तामधून निवृत्त झाल्यानंतर ते लोकमत समूहाचे संपादक झाले. सुरुवातीच्या काळात ते औरंगाबादचे संपादक होते.गेली काही वर्षे ते लोकमतचे
समह संपादक होते
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोनाची लागण झाली होती. डेंग्यू बरा झाला
पण फुफ्फुसाचा संसर्ग ८०% झाला. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे शरीर बरे होत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह
आली. मात्र, पहाटे त्यांना श्वास घेण्यास त्रास-होऊ लागला आणि पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.