
शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे घडली घटना
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील चापडगाव इथे परमेश्वर उर्फ पप्पू बाळासाहेब पातकळ वय 26 याच्यावर भर चौकात गोळीबार करण्यात आला
यात परमेश्वर पातकळ यांच्या हाताला एक गोळी चाटून गेली . आज्ञातांकडून गोळीबाराची ही घटना घडली आहे. वाळू तस्करीच्या वादातून हा प्रकार झाल्याची माहिती असून हल्लेखोर हे दोन दुचाकी वरून गेवराईच्या दिशेने आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला परंतु त्या अगोदर हल्लेखोर पसार झाले. या घटनेने मात्र चापडगाव व परिसरातील भीतीचे वातावरण पसरले आहे. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठी बाजारपेठ असणारे चापडगाव येथे शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बसस्थानका जवळ असणाऱ्या चौफुलीवर चार अज्ञात हल्लेखोरांनी परमेश्वर पातकळ यांच्यावर गोळीबार केला.