इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१६/११/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २५ शके १९४६
दिनांक :- १६/११/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २३:५१,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १९:२८,
योग :- परिघ समाप्ति २३:४७,
करण :- बालव समाप्ति १३:२२,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- तुला(०७:३१नं. वृश्चिक) – विशाखा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- रवि – वृश्चिक ०७:३१,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२६ ते १०:५० पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०२ ते ०९:२६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०२ ते ०४:२६ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
रवि वृश्चिक ०७:३१, मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल ०७:३१ ते १३:५५, अमृत १९:२८ नं., इष्टि,
————–

💐राशि भविष्य💐

मेष
कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे करून घ्याल.

वृषभ
घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीने मन आनंदी होईल.

मिथुन
कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

कर्क
उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा.

सिंह
बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.

कन्या
खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील.

तूळ
एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्राचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक
झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगवे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनू
घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडांशी स्नेहभाव वाढेल.

मकर
अचानक उद्भवणार्‍या खर्चावर आळा घालावा. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहन विषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा.

कुंभ
जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे.

मीन
उगाच रागराग करू नका. वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. कामातील उत्साह वाढेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button