घोंगडी बैठका प्रा. किसन चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकरतोय अभिनव उपक्रम!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या संकल्पनेतुन घोंगडी बैठाकांच आयोजन करण्यात येत आहे. शेवगाव तालुक्यातील हसनापुर येथुन या बैठकीला सुरुवात करण्यात आली. प्रत्येक गावात वाडी वस्त्यावर जाऊन सामान्य माणासाच्या समस्या जाणुन घेऊन त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सुरूवात केली आहे. रस्ते, विज, पाणी, महसुल संदर्भातील आनेक प्रश्न, वृध्दांना मिळत असलेल्या संजय गांधी निराधार योजना संदर्भाततील अनेक या व अशा प्रश्नासंदर्भातील प्रश्न थेट गावागावात जाऊन ते मार्गी लावण्याचा संकल्प प्रा.किसन चव्हाण यांच्या संकल्पनेतुन साकार होत आहे. या बैठकाचा मात्र आनेक गाव पुढां- यांनी धसका घेतला आहे. आनेकजन नेता आणि जनता यांच्यामध्ये पुढारी म्हणुन काम करताना गावागावात मात्र आनेकांना त्रास देऊन सामान्य जनतेची आडणुक करण्यात महिर आहेत. नेते गावात आल्यावर सामान्यांना नेत्याच्या पर्यत पोहचू न देणे व प्रश्न मांडण्यास आडथळा निर्माण करणे या आडथळ्यामूळे सर्वसामान्य नागरिक स्वतःच्या प्रश्नापासुन बाहेर येऊ शकला नाही.
यामूळे नेता आणि सामान्य जनतेची नाळ तुटत चालली आहे. मात्र अशा सामान्य गरिबांचा प्रश्न जर या घोंगडी बैठकीतुन सुटण्यास मदत झाली तर सामान्यांच्या चेहऱ्यांवर हासू फुलेल. त्यामूळे या बैठकांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने आनेकांनी धसका घेतला आहे. यामूळे सामान्य जनतेला हि मोठं बळ मिळणार असल्याने या बैठका भविष्यात वंचिताची ताकद वाढवणाऱ्या ठरणार असल्यांचं राजकिय अभ्यासाकडुन बोललं जात आहे.
सामान्य माणसाचे आनेक प्रश्न वर्षानुवर्ष पडुन आहेत. सरकार दरबारी अधिकारी पैसे मागतात, पैसे देऊनही काम होईल यांची खात्री वाटत नाही. गाव पुढारी मताचं राजकारण करताना सामान्य माणसाची आडवणूक करतात. स्वतःच्या स्वार्थीवृती मुळे गावागावात गाव पुढांच्या मी मोठा कि तु मोठा करताना गावच्या प्रश्नाकडे मात्र हया लोकांनी पाठ फिरवल्याचं दिसत स्वतःला नेत्याची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानायची यामूळे अनेक प्रश्न सामान्याच्या दारात उभे आहेत. तेच प्रश्न आपण या घोंगडी बैठकाच्या माध्यमातुन सोडवणार आहोत. या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान वाटत आहे.
प्रा. किसन चव्हाण
राज्यउपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
गेल्या काही दिवसापुर्वी मी एका सभेच्या वेळी एका राजाकिय पक्षाच्या नेत्याला माझ्या कामासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. माझा प्रश्न त्या नेत्यापर्यत पोहचवण्यात मला यश आले आसते तर तो प्रश्न निश्चित सुटला असता याची मला वैयक्तीक खात्री होती. मात्र
मात्र त्यांच्या भोवती स्वतःला नेत्यांचं कवच समजणाऱ्या एका बगलबच्च्यांनी मात्र मला माझा प्रश्न मांडू दिला नाही. त्यामूळे मला घोंगडी बैठकामध्ये माझा प्रश्न मांडण्याची वेळ आली आहे. अशा बगलबच्यांचे कान राजकिय पक्षाच्या नेत्यांनी वेळीच टोचले तर त्यांना राजकिय बसणारे धक्के टळतील. जर राजकारणात बसणारे लहान मोठे धक्के टाळायचे असले तर नेत्यांनी मोठया मनाने थेट सर्वसामान्यांच्या संपर्कात जाऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवुन करणे गरजेचे आहे. जसा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत आहे. तोच पॅटर्न महत्वाचा ठरणार आहे. अन्यथा सामान्यना वंचिताची घोंगडी बैठकच पर्याय आहे कि काय असे मला वाटते. वंचित बहुजन आघाडीच्या या घोंगाडी बैठकांचा निश्चित आमच्या सारख्याना फायदा होईल.अशी अशा बाळगतो.एक नागरिक
भातकुडगाव जिल्हा परिषद गट