टाकळी येथे 317 कामगारांना ई श्रमकार्ड चे वाटप !

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील टाकळी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प संपन्न झालायामध्ये 317 कामगारांना या कार्ड चे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्याअसंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठान हा कार्यक्रम आयोजित केला होता. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री जालिंदर वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले.
टाकळी गावातील असंघटित कामगार महीला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली शेतमजूर महिला मजूर गवंडी यांची लक्षनीय संख्या दिसली. सरकारने देशातील करोडो लोकांसाठी ही योजना राबवली असून इ श्रम कार्ड चे फायदे सामाजिक सुरक्षा लाभ, दोन लाख रुपयांचा विमा, मातृत्व लाभ, सरकारी कामात प्राधान्य असे आहेत.
यावेळी सुशील शेवाळे आणासाहेब घुले शांताराम शिंदे संतोष तिकांडे साहेबराव दातखिळे, अमोल घुले राजेंद्र थोरात विजय मेदगे पंकज शेवाळे बाळासाहेब दातखिळे सूर्यभान नाईकवाडी निलेश मोरे यांनी या कॅम्प साठी विशेष परिश्रम घेतले.