वडूले येथे भारतीय किसान सभा व कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने रास्ता रोको

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील वडुले बु येथे अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील वडुले बु, जोहरापूर, भगूर, वरुर, खरडगाव, आखेगाव या नदिकाठच्या गावांना व वाडी वस्त्यांनाअतिवृष्टीमुळे व महापूरामूळे प्रचंड नुकसान झाले. असून पंचनामे करून पाच महिने होत आले तरी जाहीर केलेली नुकसान भरपाई आद्याप योग्य लाभार्थ्यांना मिळाली नाही. शेतकर्यांचे शेत वाहून गेले, जनावरे दगावली, अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, संसारोपयोगी साहीत्य अन्नधान्य नासाडी झाली शेतकर्यांच्या शेती पंपाचे विजेचे खांब व तारा तुटल्याने आहे ते पिकेही धोक्यात आली आहेत.पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्राधान्याने ऊसतोड देण्यात यावी, असे नियम केलेले असूनही अद्याप ऊसतोड दिली जात नाही. या व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ. ॲड सुभाष लांडे, जेष्ठ नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी, कॉ. संजय नांगरे, कॉ.भगवानराव गायकवाड, बापूराव राशिनकर, दत्तात्रय आरे, मुरलीधर काळे, अंजाबापू गायकवाड, वैभव शिंदे, गंगाधर चोपडे, अशोक हरदास, शंभर हरवणे, बबन सागडे, एकनाथराव डमाळ, दत्तात्रय काथवटे, बाबुलाल सय्यद, रावसाहेब सागडे,आदी प्रमुख व शेतकरी कामगार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
